Devoleena Bhattacharjee: साथ निभाना साथिया फेम अभिनेत्रीने पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

Devoleena Bhattacharjee: २७ फेब्रुवारीला ही घटना घडल्याचा उल्लेखदेखील तिने केला आहे.
Devoleena Bhattacharjee
Devoleena BhattacharjeeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Devoleena Bhattacharjee seeks pm Narendra Modi help

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम देवोलिना भट्टाचार्जीने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे. तिने एक्स( x ) या अॅपवर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत आपला मित्र अमरनाथ घोष याची अमेरिकेत गोळ्या घालू हत्या केली असून त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करावी अशी तिने विनंती केली आहे. २७ फेब्रुवारीला ही घटना घडल्याचा उल्लेखदेखील तिने केला आहे.

देवोलीनाने लिहिले की, 'माझा मित्र अमरनाथ घोष याची मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतील सेंट लुईस अकादमीजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुटुंबात तो एकटाच होता. त्याची आई तीन वर्षांपूर्वी वारली, वडील लहानपणीच वारले. मात्र अद्याप आरोपींचा उलगडा झालेला नाही. त्याच्या काही मित्रांशिवाय त्याच्या कुटुंबात त्याच्यासाठी लढा देणारे कोणीही उरले नाही. ते कोलकाता येथील रहिवासी होते.

अभिनेत्रीने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'तो एक अद्भुत डान्सर होता आणि पीएचडी करत होता. सायंकाळी ते फिरायला गेले असता अचानक अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अमेरिकेतील काही मित्र मृतदेह आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप त्याबाबत काहीही अपडेट नाही. भारतीय दूतावास, कृपया पहा. निदान त्याच्या हत्येचे कारण तरी कळायला हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sofia Viral Lip Injection Video
Narendra Modi 25 years in government
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com