बॉलिवूड स्टार्सनी हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपले नाव कमावले आहे. अनुपम खेर (Anupam Kher) पासून ते इरफान खान (Irrfan Khan) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पर्यंत ज्यांनी बॉलीवूड तसेच हॉलिवूडमध्ये देखील उत्कृष्ट काम केले आहे. पण कोरियन फिल्म इंडस्ट्रीचा विचार केला तर इथे आपण थोडे मागे आहोत. तुम्ही नेटफ्लिक्सवर 'स्क्विड गेम' ही नवी दक्षिण कोरियाची मालिका पाहिली असेल, तुम्ही अनुपम त्रिपाठीला (Anupam Tripathi) ओळखत असाल ? अनुपम हा बॉलिवूड मधील पहिला कलाकार आहे जो कोरियन इंडस्ट्रीत झळकताना दिसत आहे.
दक्षिण कोरिया मधील सुपरहिट गोंग यू ने शेवट 'स्क्विड गेम' मध्ये दिसुन आला होता. याशिवाय 'द गार्डियन' आणि 'द ट्रेन टू बुसान' या चित्रपटांमध्ये त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. दीपिका या कोरियन चित्रपटात मुख्य भूमिकेत नसून ती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्फोटाच्या वेळी चित्रपटातील गोंग यूची पत्नी दीपिकाकडेच जाईल.
बॉलीवूडच्या टॉप क्लास अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) समावेश आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) '83' चित्रपटात ती कपिल देव (Kapil Dev) यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. शकुन बत्राच्या (Shakun Batra) अनटाइटेड चित्रपटात ती सिद्धांत चतुर्वेदी (Siddhanta Chaturvedi) आणि अनन्या पांडेसोबत (Ananya Pandey) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ती इंटर्न हिंदी रिमेक, फायटर, पठाण आणि प्रभाससोबत एका चित्रपटातही दिसणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.