Deepika Padukone: दीपिकाने रणवीरसाठी रोमँटिक पोस्ट शेअर करत म्हणाली,'तुझ्या बेस्ट....'

दीपिका पदुकोणने फ्रेंडशिप डे निमित्त रणवीरसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Deepika Padukone
Deepika PadukoneDainik Gomantak

Deepika Padukone: बॉलिवुड मधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे क्युट कपल म्हणून ओळखले जातात. दोघांची केमिस्ट्री स्क्रीनवर आणि ऑफ स्क्रीनवर खुपच गोड आहे. ६ जुलैला साजरा करण्यात आलेल्या फ्रेंडशिप डे निमित्त दीपिकाने रणवीरसाठी एक रोमँटिक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

या कपलची लव्हस्टोरीही हटके आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'राम-लीला' चित्रपटाच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर 2018 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. रणवीर सिंग अनेकदा उघडपणे दीपिकावरील प्रेम जाहीरपणे व्यक्त करतो. त्याचबरोबर दीपिकाही रणवीरवरचे प्रेम व्यक्त करायला विसरत नाही. 

deepika padukone
deepika padukoneDainik Gomantak

दीपिकाने इंस्टाग्रामवर तिचा जिवलग मित्र आणि नवऱ्यासाठी एक प्रेमळ पोस्ट लिहून सर्वांच्या लक्ष वेधले आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीजवर रणवीरला टॅग केले आणि तिने तिच्या बेस्ट फ्रेंडशी लग्न करावे असे लिहिले. 

तिने लिहिले की, "तुझ्या जिवलग मित्राशी लग्न करा... मी हे सहज बोलत नाही... तुमच्या आवडत्या व्यक्तीमध्ये तुम्हाला सर्वात मजबूत, आनंदी मैत्री दिसते. तुमच्याबद्दल खूप चांगले बोलणारी व्यक्ती. ज्याच्यासोबत तुम्ही हसू शकता... सर्व प्रकारचे आनंदी हसणे आणि विनोदाची भावना असणे आवश्यक आहे. कोणावरही प्रेम करू नका आयुष्य खूप लहान आहे"

Deepika Padukone
RARKPK Box Office Collection: 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; तब्बल इतक्या कोटींची केली कमाई

पुढे लिहिले की, "जेव्हा आयुष्यात निराशा येते, तेव्हा अशा व्यक्तीला शोधा जिच्याशी तुम्हाला वाईट काळात तुमच्यासोबत राहायचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये पॅशन आहे अशा व्यक्तीशी लग्न करा. प्रेम आणि वेडेपणा एक एक दिवस सुंदर बनवतो".

दरम्यान, दिपिका प्रभाससोबत कलकी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.तर रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  हा चित्रपट 28 जुलैला रिलीज झाला आहे. या चित्रपटाने  पहिल्या दिवशी चांगली कमाई केल्यानंतर या चित्रपटाने सुरुवातीच्या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 

रोमँटिक कॉमेडी चित्रपट

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओ यांनी केली आहे.

स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर रणवीर-आलियाशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील चित्रपटात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com