Deepika Padukone: फायटर रिलिजआधीच दीपिका अन् दिग्दर्शकामध्ये खटके

Deepika Padukone: याशिवाय 2008 मध्ये रिलीज झालेल्या 'बचना ए हसीना' या चित्रपटातही दोघांनी काम केले होते.
Actress Deepika padukone
Actress Deepika padukoneDainik Gomantak
Published on
Updated on

Deepika Padukone: दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट 'फायटर' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ती पहिल्यांदाच हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करणार असून दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबतचा हा तिसरा चित्रपट असेल. दरम्यान, दीपिका आणि सिद्धार्थने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केल्याची बातमी समोर येत आहे.

दीपिका पदुकोणने सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' चित्रपटातही काम केले होते. यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. याशिवाय 2008 मध्ये रिलीज झालेल्या 'बचना ए हसीना' या चित्रपटातही दोघांनी काम केले होते.

सिद्धार्थ आनंद इंस्टाग्रामवर फक्त 20 सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करतो. हृतिक रोशनशिवाय अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, 'वॉर' कलाकार टायगर श्रॉफ, 'पठाण' अभिनेता शाहरुख खान, अर्जुन कपूर, माहिरा खान, बिपाशा बसू आदी कलाकारांचा समावेश आहे. तर दीपिका 186 अकाउंट फॉलो करते. युजर्सचे म्हणणे आहे की, दीपिका आणि सिद्धार्थ आधीच एकमेकांना फॉलो करत नाहीत की आता त्यांना अनफॉलो केले आहे हे स्पष्ट नाही.

असे म्हटले जात आहे की, दीपिका 'फायटर'च्या निर्मात्यांवर नाराज आहे. कारण तिला चित्रपटात हृतिकपेक्षा कमी स्क्रीन स्पेस मिळाली आहे. यामुळेच ती या चित्रपटाचे प्रमोशन करत नसल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, सिद्धार्थ आनंदचा 'फाइटर' हा 2024 सालातील मोस्ट अवेटेड सिनेमांपैकी एक आहे. चित्रपटाचा टीझर आणि गाणी रिलीज झाली असून ती पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. निर्मात्यांनी नुकतेच सांगितले की, चित्रपटाचा ट्रेलर १५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tata Trust Dispute 2026
cbse class 12 osm website data leak ethical hacker nisarga adhikari coempt edutech sarthak siddhant supreme court revaluation scam
Vladimir Putin Anti Aging Mission
Goa Inquisition and Sanskritization parallels
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com