Daughter's Day 2021: हे 4 चित्रपट पालक आणि मुलीच्या नात्यांवर आधारित

प्रत्येक कुटुंबात आई- वडील आणि मुलींचे नाते वेगळे असते, परंतु अनेक चित्रपटांबद्दल हे नाते अधिक मजबूत दाखविले जाते.
Daughter's Day 2021: हे 4 चित्रपट पालक आणि मुलीच्या नात्यांवर आधारित
Daughter's Day 2021: हे 4 चित्रपट पालक आणि मुलीच्या नात्यांवर आधारितDainik Gomantak
Published on
Updated on

कोणत्याही नात्यांना साजरे करण्यासाठी कोणत्याही तारखेची गरज नसते. परंतु गेल्या अनेक दशकापासून, नातेसंबंध साजरे करण्यासाठी एक तारीख देखील निश्चित केली गेली आहे. आज आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त आम्ही तुमच्याशी अशा चार चित्रपटांबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये पालक आणि मुली यांचातील दृढ आणि प्रेमळ नातेसंबंध दर्शविले आहेत.

* थप्पड

या यादीत पाहिल्यांदा थप्पड चित्रपटचा समावेश होतो. अभिनेत्री तापसी पन्नू आणि अनुभव सिन्हा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून या चित्रपटात बाप आणि लेकीच्या मजबूत बांधनाला पूर्णपणे न्याय देतो. एक वडील क्वचितच आपल्या मुलीवर हात उगरतो आणि जेव्हा त्याला कळते की तिच्या पटीने तिच्यावर हात उगारला आहे किंवा तिचा अपमान केला आहे तेव्हा तेचे वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. या चित्रपटात जेव्हा ती घटस्फोट घेण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिचे वडील तिच्या पाठीशी उभे असतात. वडील हे जगातील एकमेव असे व्यक्ति आहे की जे आपल्या मुलीचे दुख जाणतो आणि तिच्या निर्णयावर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. हा चित्रपट एक पिता आणि मुलीच्या निस्वार्थी प्रेमाचे, काळजीचे आणि समर्थनाचे एक उत्तम उदाहरण आहे.

* गुंजन सक्सेना

प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की त्यांची मुले आयुष्यात यशस होवोत आणि नेहमी आनंदी राहावे. पण जेव्हा पुरुष वर्चस्व सोसायटीनुसार मुलींसाठी योग्य नसलेले करियर निवडण्याचा प्रश्न येतो, तेव्हा वडील आपल्या मुलीचे ते करियर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जान्हवी कपूर आणि पंकज त्रिपाठी यांचा गुंजन सक्सेना हा चित्रपट केवळ एका करगिल नायकाची कथा नाही, तर त्याचबरोबर वडील आणि मुलीचे एक सुंदर नातेही या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ज्या प्रकारे वडील आपल्या मुलीला तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करतात, ते प्रत्येक पालकांनी केले पाहिजे .

* त्रिभंगा

त्रिभंगाहा चित्रपट एका विखुरलेल्या कुटुंबाची कथा आहे. या चित्रपटात मुलगी आधी आपल्या आईचा तिरस्कर करते आणि नंतर ती जेव्हा कोमात जाते तेव्हा तिला हरवल्याच्या भावनेने ती भयभीत होते. हा चित्रपट दाखवतो की मुळे त्यांच्या पालकांचा कितीही द्वेष करत असले तरी त्यांचे आई-वडील आपल्या मुलांचा द्वेष कधीच करू शकत नाही.

* मॉम

श्रीदेवीच्या मॉम या चिटपटात आई आणि मुलीची कथा दाखवण्यात आली आहे.जे अत्यंत दुखात असतात. जर आपल्या मुलाला थोडे जारी खरचटले तर आईला काळजी वाटते. पण जेव्हा आईला तिच्या प्रियकरासोबत झालेल्या बलात्काराची माहिती येते तेव्हा ती मा कालीचे रूप धारण करते. ती गुन्हेगारांना एक एक करून शिक्षा देते. ज्यामुळे तिची मुलगी दुखावली गेलेली आहे. हा चित्रपट दाखवतो की जर आपल्या मुलांवर काही अडचण आल्यास पालक त्यांना त्या अडचणीमधून बाहेर काढण्यास तयार असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com