'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावरून दिग्दर्शक अन भाजप नेत्यामध्ये वादाची ठिणगी

द काश्मीर फाइल्स हा चित्रपट मोठ्या पडद्यावर मोफत दाखवण्याच ठरलं निमित्त
The Kashmir Files
The Kashmir Files Dainik Gomantak
Published on
Updated on

The Kashmir Files: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहण्यासाठी जगभरातून लोक थिएटरमध्ये पोहोचत आहेत. काश्मिरी पंडितांची दर्दभरी कहाणी विवेकने मोठ्या पडद्यावर अशा प्रकारे दाखवली आहे की या चित्रपटाने सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. मात्र, या चित्रपटाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागत आहे. (Controversy erupts between director and BJP leader over 'The Kashmir Files' movie)

भाजप कार्यकर्ते फुकटात चित्रपट दाखवत आहेत, असा अरोप करत आता विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) मोफत दाखवण्याबाबत ट्विट केले आहे. विवेकने एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये हरियाणाचे रेवाडीचे अध्यक्ष केशव चौधरी (बिट्टू), युवा नेते मुकेश यादव कपरीवास आणि माजी आमदार रणधीर सिंह कपरीवास मोठ्या पडद्यावर 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट मोफत दाखवण्याबाबत बोलत आहेत. पोस्टरमध्ये स्थळ आणि वेळ सांगून प्रेक्षकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

विवेकने केले ट्विट जेव्हा हे पोस्टर विवेक अग्निहोत्रीपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी तत्काळ ट्विट करत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांना हे थांबवण्याची विनंती केली. विवेकने लिहिले, 'सावधान: काश्मीर फाइल्स अशा पध्दतीने तसेच विनामूल्य दाखवणे गुन्हा आहे. ते पुढे म्हणाले प्रिय मनोहर लाल जी, मी तुम्हाला हे थांबवण्याची विनंती करतो. राजकीय नेत्यांनी सर्जनशील व्यवसायाचा आदर केला पाहिजे.

खरी देशभक्ती आणि समाजसेवा म्हणजे कायदेशीर आणि शांततेने तिकीट खरेदी करणे. या ट्विटच्या कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरचे म्हणणे आहे की काही रोजंदारी कामगारांपर्यंतही हे भाजपचे कार्यकर्ते हा अप्रतिम चित्रपट पोहोचवत आहेत. अशा स्थितीत विवेकने आनंदी राहावे.

नेटफ्लिक्स किंवा अॅमेझॉन प्राइम, काश्मीर फाइल्स कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येतील?

द काश्मीर फाइल्सच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत या चित्रपटाने नऊ दिवसांत 141.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय. काश्मिरी पंडितांच्या व्यथा पाहून प्रेक्षकांचेही डोळे ओले होत आहेत. हा चित्रपट 150 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com