Coffee with Karan: महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी हार्दिक पंड्या अन् केएल राहुलला हायकोर्टाचा दिलासा

2018 मध्ये, हार्दिक पंड्या आणि केएल राहुल हे दोघेही युवा खेळाडू बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण 6' मध्ये दिसून आले होते.
Hardik Pandya, KL Rahul And Karan Johar
Hardik Pandya, KL Rahul And Karan JoharDainik Gomantak
Published on
Updated on

क्रिकेट आणि बॉलीवूडमध्ये नेहमीच घनिष्ट संबंध राहिले आहेत आणि यामुळे, 2018 मध्ये, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) हे दोघेही युवा खेळाडू बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण 6' मध्ये दिसून आले होते. शोदरम्यान हार्दिक पांड्याने महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी जोधपूरमध्ये हार्दिक, केएल राहुल आणि करण जोहर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच आता खटला दाखल होऊन 3 वर्षांनी जोधपूर उच्च न्यायालयाने () या प्रकरणी तिघांनाही मोठा दिलासा दिला आहे. ()

Hardik Pandya, KL Rahul And Karan Johar
Koffee With Karan 7: आमिर खानला बॉलिवूड पार्ट्या का आवडत नाहीत?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डीआर मेघवाल यांनी करण जोहर, हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जवळपास तीन वर्षांनंतर न्यायालयाने हा खटला फेटाळून लावत तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. पंड्याच्या अकाऊंटवरून बाबा भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद आणि महिलांबद्दल अश्लील टिप्पणी असलेले ट्विट करण्यात आले होते.

यानंतर हार्दिक पांड्याने जोधपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्या ट्विटर अकाऊंटवरून वादग्रस्त ट्विट केले गेले होते ते पांड्याचे व्हेरिफाईड अकाऊंट नव्हते. याशिवाय शोदरम्यान महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. हा युक्तिवाद मान्य करत जोधपूर उच्च न्यायालयाने हार्दिक पांड्या, केएल राहुल आणि करण जोहर यांना दिलासा दिला आहे.

काय होते संपूर्ण प्रकरण

'कॉफी विथ करण 6' च्या एपिसोडमध्ये हार्दिक पांड्याने त्याच्या सेक्स लाईफबद्दलचा खुलासा केला होता. त्याचे किती महिलांशी संबंध आहेत हे त्याने त्यावेळी सांगितले होते. तसेच आई-वडिलांसमोरही तो अशा गोष्टी करत असे. याशिवाय तो म्हणाला की तो मुलींना त्यांच्या नावावरून ठरवत नाही तर त्यांच्या जवळीकीने ठरवतो आणि या वादानंतर क्रिकेटपटूंना अशा टॉक शोमध्ये सहभागी होण्याची परवानगी द्यायची की नाही यावर विचार करण्यास बीसीसीआयला सांगण्यात आले होते.

दोन्ही खेळाडूंनी आधीच माफी मागितली होती,

या वादानंतर सोशल मीडियावर दोन्ही खेळाडूंवर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच बोर्डाने दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मालिकेतून निलंबित केले होते. याशिवाय बोर्डाने हार्दिक आणि राहुल या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर दोन्ही खेळाडूंनी लेखी माफी मागितली या माफीनाम्यात त्यांनी लिहिले की, 'कॉफी विथ करण वरील आमच्या वक्तव्यामुळे कुणाची मने दुखावली गेली आहेत त्यांची आम्ही माफी मागतो'.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com