Dinesh Phadnis Passes Away: CID मध्ये फ्रेड्रिक्सची भुमिका निभावणाऱ्या दिनेश फडणीस यांचे निधन

Dinesh Phadnis Passes Away: १९९८ ते २०१८ इतका दीर्घकाळ ते सीआयडीचा भाग होते.
Dinesh Phadnis Passes Away
Dinesh Phadnis Passes AwayDainik Gomantak
Published on
Updated on

Dinesh Phadnis Passes Away: सीआयडी ( CID ) या क्राइम मालिकेने अनेक वर्ष सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेचा आणि यातील कलाकारांचा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. आता यामध्ये फ्रेड्रिक्स हे पात्र अजरामर करणाऱ्या दिनेश फडणीस या अभिनेत्याचे निधन झाले आहे.

अभिनेत्याचे लिव्हर डॅमेजमुळे निधन झाल्याची माहीती समोर आली आहे. रात्री १२ च्या सुमारास त्यांचे निधन झाले असून त्यांना मुंबईच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये अॅडमीट केले होते. आज त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

दिनेश फडणीस हे ५७ वर्षांचे होते. त्यांनी सीआयडी मध्ये त्यांचा कॉमेडी अंदाज पाहायला मिळाला होता. १९९८ ते २०१८ इतका दीर्घकाळ ते सीआयडीचा भाग होते. ते या मालिकेत फेड्रिक्स या पात्रात दिसले. सीआडीबरोबरच अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये कॅमियो करताना दिसले आहेत

Dinesh Phadnis Passes Away
Dunki Trailer: डंकीचा नवीन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

आता त्यांच्या पश्च्यात पत्नी नैना आणि एक लहान मुलगी तनु आहे. सध्या सीआयडीमध्ये त्यांच्यासोबत ज्या टीमने काम केले होते ती त्यांच्या घरी असल्याची माहीती त्यांचे जवळचे मित्र दयानंद शेट्टी यांनी दिली आहे. त्यांच्या जाण्याने चाहते आणि कलाकार हळहळ व्यक्त करताना दिसत आहे.

दरम्यान, 1990 च्या दशकात जन्मलेल्या मुलांच्या हृदयात 'सीआयडी'चे विशेष स्थान आहे. हा 1990 आणि 2000 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर पाहिल्या गेलेल्या टेलिव्हिजन कार्यक्रमांपैकी एक होता. 

सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा हा कार्यक्रमाने सातत्याने आपल्या दमदार कलाकार आणि कथेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शोच्या स्टार कास्टमध्ये शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव, जानवी छेडा गोपालिया, हृषिकेश पांडे, श्रद्धा मुसळे आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com