Chandrachur Singh: 'या' गोष्टीने मला चित्रपटसृष्टीपासून दूर नेले दिग्गज अभिनेत्याचा खुलासा

Chandrachur Singh: 2022 मध्ये अक्षय कुमारचा ओटीटी चित्रपट 'कठपुतली' मध्ये पाहिले होते.
Chandrachur Singh
Chandrachur SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Chandrachur Singh: बॉलीवूडमध्ये असे काही सितारे आहेत जे चर्चेत येण्यापासून दूर राहतात. यामध्ये बॉलीवुड अॅक्टर चंद्रचूड़ सिंह यांचेही नावही घ्यावे लागेल. कॅमेरापासून दूर राहणारा अभिनेता आता आपल्या मुलामुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता चंद्रचूड़ सिंह आपला मुलगा श्रवणजय सिंह सोबत मुंबई एयरपोर्टवर दिसून आला. त्यावेळचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. चाहते श्रवणजयला आपल्या वडीलांची कॉपी असल्याचे म्हणत आहेत. पत्नीच्या मृत्यूनंतर ते आपल्या मुलाला एकटे वाढवत आहेत.

अभिनयापासून चंद्रचूड सिंह दूर का?

चंद्रचूड सिंह यांनी चित्रपटसृष्टीला एकाेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र अचानक ते अभिनय क्षेत्रापासून दूर गेले. मिळालेल्या माहीतीनुसार, गोव्यात त्यांचा स्कीइंग करताना त्यांचा अपघातात झाला होता. त्यावेळी त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना अनेक चांगले प्रोजेक्ट सोडावे लागले. काही वर्षापर्यंत त्यांना काम करता आले नाही. १० वर्षे ते अभिनयक्षेत्रापासून दूर राहिले. या गोष्टीने मला चित्रपटसृष्टीपासून दूर नेल्याचा खुलासा या दिग्गज अभिनेत्याने केला आहे.

चंद्रचूड सिंह यांचे अभिनय क्षेत्रातील योगदान

अभिनेते चंद्रचूड सिंह यांना लहानपणापासूनच अॅक्टिंग आणि सिंगिंगची आवड होती. त्यांनी सिंगिंगचे ट्रेनिंगदेखील घेतले आहे. त्यांनी आवारगी चित्रपटात असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्यानंतर 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून अॅक्टिंगच्या करिअरला सुरुवात केली. तब्बूसोबतच्या त्यांच्या माचीस चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी 'दाग: द फायर', 'क्या कहना' यासारख्या हिट चित्रपटात काम केले आहे. त्यांना 2022 मध्ये अक्षय कुमारची ओटीटी फिल्म 'कठपुतली' मध्ये पाहिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com