यामी गौतमचा आर्टिकल ३७० हा चित्रपट रिलिज झाल्यापासून मोठ्या चर्चेत आहे. सुरुवातीला या चित्रपटाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळताना दिसत होता, त्यामुळे बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट टिकणार का आणि किती कमाई करु शकणार असा अनेकांना प्रश्न पडला होता. आता मात्र यामीचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जम बसवताना दिसत आहे.
चित्रपटाने दुसऱ्या रविवारी 6.75 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर दुसऱ्या सोमवारी 1.75 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने 11 दिवसांत एकूण 52.60 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनचे आकडे पाहिले तर ते 70 कोटींच्या जवळपास पोहोचले आहेत.
आर्टिकल ३७० हा चित्रपट जम्मू काश्मीर मधील विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० हटवण्याच्या घटनेवर आधारित आहे. हा ऐतहासिक निर्णय मानला जातो. जेव्हा हे कलम हटवले गेले तेव्हा जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषत: पाकिस्तानचा विरोध असल्याचे पाहायला मिळाले होते. ही संपूर्ण घटना या चित्रपटात चित्रित केल्याचे पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, यामी गौतम, प्रियमणी यांनी निभावलेल्या भूमिकांचे मोठे कौतुक होताना दिसत आहे.
हा चित्रपट यशस्वी झाल्यास १०० कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अरुण गोविल पीएम मोदींच्या भूमिकेत दिसून येत आहेत. त्यांच्याशिवाय प्रियमणी, वैभव तत्ववादी, किरण करमारकर आणि राज जुत्शी यांसारखे अनेक दिग्गज कलाकार आहेत.आता हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.