Viral Video: भाऊ इज बॅक! रितेश सलमान पुन्हा एकत्र, पाहा धम्माल व्हिडिओ

रितेश देशमुखचा पहिला वहिला मराठी चित्रपट लई भारी यात देखील सलमान खानने छोटी भूमिका केली होती.
Salman khan And Riteish Deshmukh
Salman khan And Riteish DeshmukhDainik Gomantak
Published on
Updated on

Salman khan And Riteish Deshmukh Song: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा सिनेमा जगतात मोठा दबदबा आहे. सलमान आपल्या चित्रपटात असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. सलमान देखील अनेक चित्रपटात छोटी मोठी भूमिका करत असतो. रितेश देशमुखचा पहिला वहिला मराठी चित्रपट लई भारी यात देखील सलमान खानने छोटी भूमिका केली होती. या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले होते. दरम्यान, रितेश सलमान (Salman khan And Riteish Deshmukh) पुन्हा एकत्र आले आहेत.

(Bollywood superstar Salman khan And Riteish Deshmukh reunites for song)

Salman khan And Riteish Deshmukh
MVA Morcha Mumbai: महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा; तिन्ही पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा सहभाग

लई भारी चित्रपटात सलमानने छोटीशी भूमिका केली पण, प्रक्षेकांनी या भूमिकेचे कौतुक केले होते. सध्या रितेश आणि जेनेलियाचा एक मराठी चित्रपट येत आहे. वेड असे या चित्रपटाचे (Marathi Film Ved) नाव असून या चित्रपटाचा ट्रेलर खूप व्हायरल होत आहे. जेनेलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चितपटात आता बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान रितेश देशमुखसोबत एक गाणं करत आहे. गाण्याची पहिली झलक समोर आली आहे. यात सलमानचा अंदाज भाव खाऊन जात आहे.

Salman khan And Riteish Deshmukh
Sunburn Festival Goa: 'सनबर्न'ला पर्यटन खात्याची परवानगी पण...दंडाची रक्कम पाहून तुम्हाला घाम फुटेल

रितेश देखील या गाण्यात दारूड्याच्या भूमिकेत दिसत आहे. या गाण्यात दोघांची केमिस्ट्री फारच उत्तम आहे. रविवारी म्हणजेच उद्या हे गाणं सर्वांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना या गाण्याची उत्सुकता लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com