Govinda On Goa: बॉलीवूडच्या सुपरस्टारचे गोव्यावर विशेष प्रेम; 'हे' आहे कारण

Govinda On Goa: तो सर्वात सुंदर काळ होता असे मला नेहमीच वाटते.
Govinda
Govinda Dainik Gomantak

Govinda On Goa: गोवा हे अनेकांचे आवडते ठिकाण आहे. मात्र बॉलिवूडस्टार गोविंदाचे गोव्यावर विशेष प्रेम असल्याचे त्याने म्हटले आहे. अभिनेत्याच्या मनात गोव्याचे विशेष स्थान असण्याची अनेक कारणे असली तरी त्यातील सर्वात महत्वाचे कारण त्याची लव्हस्टोरी आहे.

गोविंदा म्हणतो, पूर्वी मी गोव्याला बऱ्याचदा यायचो. इथली भाषादेखील माझ्या परिचयाची आहे. मला मराठी उत्तम बोलता येते, त्यामुळे गोवा नेहमीच जवळचा वाटत आला आहे. अनेकांना हे माहीत नसल्याने त्यांची गल्लत होते.

एकदा एक टॅक्सी ड्रायव्हर गळ्यात साखळी सोन्याची हे गाणं गात होता , त्याला वाटले मला मराठी कळत नाही मला हे सांगताना तो हसत सुटला होता अशीही आठवण गोविंदाने सांगितली आहे.

गोविंदा म्हणतो, गोवा माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि माझ्या मनाच्या जवळ आहे कारण मी आणि पत्नी सुनिता आमच्या नात्याच्या अगदी सुरुवातीला पहिल्यांदाच कपल म्हणून गोव्याला आलो होतो आणि आमच्या लव्हस्टोरीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. तो सर्वात सुंदर काळ होता असे मला नेहमीच वाटते.

कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा 'हसीना मान जायेगी' हा चित्रपटदेखील गोव्यात शूट झाला होता. अशा कारणांमुळे गोव्याविषयी विशेष प्रेम वाटत असल्याचे गोविंदाने म्हटले आहे.

Govinda
"2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही" सनी देओलने स्पष्टच सांगितलं

गोविंदाला आपला आदर्श माननारे अनेकजण आहेत. पण तिथेपर्यत पोहोचायला मला खूप कष्ट घ्यावे लागले असे गोविंदा सांगतो. माझी आई मला नेहमी सांगायची, जर तुला शिकायचे आहे तर तुला स्वत:ला शिकावे लागेल दुसरे कोणीही तुला शिकवायला येणार नाही.

महत्वाचे म्हणजे हा सल्ला माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. मी माझ्या चित्रपट निर्मात्यांसाठी, प्रेक्षकांसाठी आणि सिस्टमसाठी कायम उत्तम ठरलो आहे. मी या इंडस्ट्रीमध्येच शिकलो आणि ही सिनेमाची प्रोसेस समजून घेतली. मला आजपर्यंत जितक्या भूमिका मिळाल्या त्याचे मी सोने केले, माझे संपूर्ण प्रयत्न केले असेही गोविंदाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com