संजय दत्त करणार साऊथ चित्रपटात एंट्री..!

टॉलिवूड आणि बॉलीवूडचे एकत्र येणे सध्या ट्रेंडमध्ये आहे...
Bollywood News
Bollywood NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Bollywood News : बॉलिवूड स्टार सलमान खाननंतर आता अभिनेता संजय दत्तही साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या चित्रपटात एंट्री करणार आसून, खलनायकाची भूमिका साकारणार आहे. टॉलिवूड आणि बॉलीवूडचे एकत्र येणे सध्या ट्रेंडमध्ये आहे. बॉलिवूडचे अनेक स्टार्स साऊथ सिनेमाकडे वळू लागले असून. त्याचबरोबर टॉलिवूड स्टार्सही हिंदी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावताना दिसत आहेत. टॉलिवूडच्या यादीत मेगास्टार चिरंजीवीच्या नावाची भर पडली

Bollywood News
'तेरे लिए हम हैं जिए' कंगनाचा जीव नेमका कुणात गुंतला?

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने यापूर्वीच टॉलिवूड सुपरस्टार चिरंजीवीच्या 'गॉडफादर' या चित्रपटासाठी होकार दिला होता दरम्यान, या चित्रपटात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार सलमान खाननेही या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आपल्या तारखा दिल्या असून चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. शिवाय आता ताजी चर्चा अशी आहे की या चित्रपटात आणखी एक देखणा बॉलिवूड स्टार दिसणार आहे. बातम्यांनुसार, निर्माते चित्रपटातील मुख्य खलनायकासाठी बॉलिवूड स्टारच्या शोधात होते. यासाठी KGF 2 चा मुख्य खलनायक म्हणजेच संजय दत्तला संपर्क करण्यात आला आहे. संजय दत्तने या चित्रपटासाठी सहमती दर्शवली तर केवळ साऊथच नाही तर बॉलिवूडमध्येही त्याची क्रेझ पाहायला मिळेल.

यापूर्वी संजय दत्त तेलगू चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट 1986 मध्ये बनला होता. त्याचे नाव चंद्रलेखा होते. चिरंजीवीचा गॉडफादर हा ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट लुसिफरचा तेलुगु रिमेक आहे. मोहन राजा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, आरबी चौधरी प्रेझेंटेशन अंतर्गत एनव्ही प्रसाद आणि राम चरण यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com