बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आगामी चित्रपट "गहराईयाँ" चे प्रमोशन करण्यासाठी "द कपिल शर्मा शो" मध्ये आली होती. तेव्हा तीच्या सोबत चित्रपटमधील अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करावा देखील होते. या शोमध्ये बोलताना दीपिकाने गोव्याबद्दल (Goa) असलेले प्रेम व्यक्त केले आहे.
या शोमध्ये दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्यासह कलाकारांनी देखील कॅमेरावरील आणि कॅमेराबाहेर आलेले मजेशीर अनुभव प्रेक्षकांच्या आनंदासाठी शेअर केले आहेत. या चित्रपटामधील कलाकारांसोबत गप्पा मारताना, या शोचा होस्ट कपिल शर्मा दीपिकाला तीच्या गोव्यावरील प्रेमामागील कारण विचारतो.
कपिलने दीपिकाला (Deepika Padukone) विचारले की तिला गोव्याला (Goa) कलाकारांना घेवून जायचे होते की प्रत्यक्षात तिला सुटयांचा आनंद घेण्यासाठी गोव्याला जायचे होते, तेव्हा दीपिका गंमतीने म्हणाली, मला बस सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गोव्याला जायचे आहे.
कपिल नंतर सांगतो की दीपिकाला गोवा हे ठिकाण खूप आवडते. गोव्यात राहायला दीपिकाला आवडते. तिने 'फाइंडिंग फॅनी' (Finding Fanny) या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. मी लहानपणी नेहमी गोव्याला (Goa) जात होती,कारण मला गोवा खूप आवडायचा, मला असेही वाटले होते की आम्ही सर्वजण भविष्यात गोव्यात एकत्र राहू,असे म्हणत बॉलीवुडच्या मस्तानीने आपले गोवा प्रेम व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.