Stand With Ukraine: भाईजानच्या गर्लफ्रेंडचा युक्रेनवर जीव, पुतिनविरोधात 'दबंगगिरी'

रशिया-युक्रेन युद्धाबद्दल बॉलीवुडमधील अनेक स्टार आपले मत व्यक्त करतांना दिसत असून त्यात सलमान खानची खास मैत्रीण युलिया वंतूरने युद्धाविरोधात राग व्यक्त केला आहे.
Iulia Vantur
Iulia VanturInstagram/@vanturiulia
Published on
Updated on

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध एक धोकादायक वळण घेत आहे. आतापर्यंत या युद्धात अनेकांना आपले प्राण गमावले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक बॉलीवुड सेलेब्रिटीही चिंतेत आहेत. आता या वादावर सलमान खानची (Salman Khan) गर्लफ्रेंड युलिया वंतूरने (Iulia Vantur) प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री आणि गायिका युलियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर (Instagram) आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातून ती युक्रेनला (Ukraine) सुपोर्ट करतांना दिसत आहे.

रुमानियाच्या युलिया वंतूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात स्पष्टपणे ती युक्रेनला समर्थन करतांना दिसत आहे. दुसरी बातमी शेअर करतांना युलिया वंतूरने युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे कौतुक केले. ही बातमी युक्रेनच (Ukraine) राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्याबद्दल होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की अमेरिकेने (America) झेलेन्स्कीला वाचवण्याची ऑफर दिली होती, ज्यावर त्याने देश वाचवण्याचा निर्णय घेतला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, मला युद्ध शस्त्रे हवी आहेत, राईडची गरज नाही.

Dainik Gomantak
Iulia Vantur
Poori Gal Baat: मौनी अन् टायगरच्या केमिस्ट्रीने नेटकऱ्यांना लावलं याड

आतापर्यंत बॉलीवुडमधील (Bollywood) अनेक सेलेब्रिंटिनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अलिकडेच गायक जावेद अख्तर यांनी युक्रेन आणि रशिया युद्धावर शक्तीशाली देशांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचवेळी ऋचा चढ्ढा, अर्शद वारसी ते तिलोत्तमा शोम यांच्यासह अनेक स्टारनी या प्रकरणात मौन सोडले. आतापर्यंत नेदयर्लंडसारखे अनेक देश युक्रेनच्या मदतीस पुढे आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com