
Aditya Roy Kapoor with Goa Model: आपल्या मनमोहक हास्याने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आदित्य रॉय कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २००९ मध्ये लंडन ड्रीम्समधून पदार्पण करणाऱ्या आदित्यला २०१३ मध्ये आलेल्या 'आशिकी २' या चित्रपटाने व्यावसायिक यश मिळवून दिले आणि तो नव्या पिढीच्या रोमँटिक चित्रपटांसाठी 'गो-टू' अभिनेता बनला. पडद्यावरील त्याची केमिस्ट्री नेहमीच कमाल राहिली आहे, पण आता पडद्यामागेही एका नव्या प्रेमाने त्याच्या दारावर थाप दिली असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अनन्या पांडेशी ब्रेकअप झाल्यानंतर आदित्य रॉय कपूरला पुन्हा प्रेम मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांना कारण ठरली आहे आदित्यची ९ जुलै २०२५ रोजीची इन्स्टाग्राम पोस्ट. आदित्य एका एअरबीएनबीमध्ये स्टेकेशन करत होता आणि त्याने त्या आलिशान प्रॉपर्टीचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये एस्टेटचे सुंदर स्नॅपशॉट होते, पण एका महिलेच्या पांढऱ्या नेलपॉलिश लावलेल्या हाताने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
या फोटोंमध्ये कोणालाही टॅग केले नसले तरी, चाहत्यांना विश्वास आहे की, हा हात गोव्याची मॉडेल जॉर्जिना डिसिल्वाचा आहे. केवळ अटकळींवरून हा निष्कर्ष काढण्यात आलेला नाही; चाहत्यांनी जॉर्जिनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन पाहिले असता, तिने तिच्या लेटेस्ट पोस्टमध्ये तशाच नेलपॉलिशसह एक फोटो पोस्ट केल्याचे लक्षात आले.
इतकेच नाही, तर आदित्य आणि जॉर्जिना दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत असल्याचेही चाहत्यांनी शोधून काढले. आदित्यच्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील होता, ज्यात तो दोन महिलांसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे.
यावर नेटकऱ्यांनी आदित्यच्या पोस्टवर लगेच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले, "कोण आहे हा सॉफ्ट लाँच करत असलेला?" दुसऱ्याने विचारले, "कोणी तो हात पाहिलाय का?" एका कमेंटमध्ये होते, "पांढऱ्या नेलपॉलिश असलेली ती मुलगी कोण आहे?" तर दुसऱ्याने लिहिले, "मला आश्चर्य वाटते ती मिस्ट्री गर्ल कोण आहे?" अनेकांनी ती गोव्याची मॉडेल जॉर्जिना डिसिल्वा असल्याचे म्हटले. एका युजरने थेट "ती @georginadsilva आहे," असे सांगितले. मात्र, काही जणांनी 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे तो सारा अली खानचा हात असल्याचेही मत मांडले.
आदित्य रॉय कपूर यापूर्वी अनन्या पांडेशी रिलेशनशिपमध्ये होता. जवळपास दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सुरुवात झाली होती, जेव्हा अनन्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक नोट शेअर केली होती.
आता अनन्या पांडे वॉकर ब्लँकोला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांनीही ब्रेकअपवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, अनन्याच्या एका मैत्रिणीने बॉम्बे टाइम्सला सांगितले होते की, "अनन्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे; अर्थातच तिला दुःख झाले आहे. आदित्य देखील या परिस्थितीला समजूतदारपणे हाताळण्याचा प्रयत्न करत आहे."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.