Bobby Deol: बॉबी देओलने चाहत्याला ढकलले अन् चाहते म्हणाले यशाची हवा डोक्यात...

Bobby Deol: हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल असून चाहते बॉबी देओलला ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे
 Bobby Deol
Bobby DeolDainik Gomantak
Published on
Updated on

Bobby Deol: सध्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकुळ घातला आहे. चित्रपटात काही प्रमाणात टीका केली जात असली तरी चित्रपटाने कोट्यावधींची कमाई करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. चित्रपटात कमी वेळ दिसणाऱ्या बॉबी देओलने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले असून तो सध्या मोठ्या चर्चेत आहे.

मात्र आता बॉबी देओलला नेटकरी ट्रोल करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 14 डिसेंबरला तो विमानतळावर दिसला होता. त्यावेळी एका चाहत्याला त्याचा धक्का लागल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर बॉबी देओल त्या चाहत्याची विचारपूस करण्यासाठी थांबला नाही. तो घाईत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे.

हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल असून चाहते बॉबी देओलला ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका चित्रपटाचे यश अभिनेत्याच्या डोक्यात गेले असून चाहत्यांशी या प्रकारची वागणूक अयोग्य असल्याचे चाहते म्हणताना दिसत आहेत. व्हिडिओ अपलोड होताच कमेंट सेक्शनचा पूर आला. एका यूजरने लिहिले की, 'त्याने त्या माणसाला खूप वाईट पद्धतीने ढकलले, हे किती चुकीचे आहे, 25 वर्षांत एक हिट आणि त्याचे वाईट चित्रपट पहा.

बॉबी देओलचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या सुपरहिट चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतून बाहेर पडताना दिसत होता. क्लिपमध्ये तो एका व्यक्तीला मिठी मारून रडताना दिसत होता. लोकांनी दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल तो प्रेक्षकांचे आभार मानताना दिसला होता.

आता बॉबी देओल यावर काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंधाना आणि बॉबी देओलची मुख्य भूमिका असणाऱ्या अॅनिमल चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com