BMC put up notice outside Kareena Kapoor Khans house

BMC put up notice outside Kareena Kapoor Khans house

Dainik Gomantak

BMC ची करीनाच्या घराबाहेर नोटीस, उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

हे नियम कोणी मोडण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
Published on

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खानच्या (Kareena Kapoor Khan) घराबाहेर बीएमसीने नोटीस लावली आहे. यापूर्वी बीएमसीने (BMC) करीनाचे घर सील केले होते. आता अभिनेत्रीच्या घराबाहेर एक नोटीस चिकटवण्यात आली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की या भागात एका व्यक्तीला कोरोना झाला आहे, त्यामुळे सुरक्षेचा विचार करून निर्बंध लावण्यात आले आहेत. हे नियम कोणी मोडण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीएमसीने त्यांचा फ्लॅट सील केला. या दोन्ही अभिनेत्री सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूर यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

करीना कपूरने सोशल मीडियावर पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली

करिनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. तिने लिहिले, माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे आणि जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांची आरटी पीसीआर चाचणी करून घ्यावी. माझ्या कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी सदस्यांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

<div class="paragraphs"><p>BMC put up notice outside Kareena Kapoor Khans house</p></div>
K3G ची 20 वर्ष, आलिया म्हणतीये 'ये कोन हैं जिसने पु को नहीं पहचाना'

ओमिक्रोनच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने हा निर्णय घेतला आहे. ओमिक्रोनने (Omicron) मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद केली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. नुकतेच करण जोहरने 'कभी खुशी कभी गम'ला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, आलिया भट्ट, मलायका अरोरा यांनीही या पार्टीला हजेरी लावली होती. करिनाच्या संपर्कात आलेल्या 30 लोकांची आरटीपीसीआर करण्यात आली असून, त्यांचा अहवाल मंगळवारी संध्याकाळपर्यंत येऊ शकतो.

करणच्या आधी रिया कपूरच्या घरी होती पार्टी

करण जोहरच्या पार्टीला कोरोना स्प्रेडर मानलं जात आहे. आलिया भट्ट देखील त्याच्या पार्टीत सामील होती, जी सध्या तिच्या आगामी 'आरआरआर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान ती अनेकांना भेटली आहे, त्यामुळे आलिया पॉझिटिव्ह आली तर अनेकांना संसर्ग होण्याची भीती आहे. करण जोहरच्या आधी अनिल कपूरची मुलगी रिया कपूरच्या घरी एक पार्टी झाली होती ज्यामध्ये करिश्मा कपूर आणि मलायका अरोराही उपस्थित होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com