Birthday Special: सोहा अली खानला अ‍ॅक्टिंगसह पुस्तकांचीही आवड

सोहा अली खानने " द पेरील्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस'( The Perils Of Being Moderately Famous) नावाचे पुस्तक लिहिले आहे.
Birthday Special: Soha Ali Khan loves acting as well as books
Birthday Special: Soha Ali Khan loves acting as well as booksInstagram/@sakpataudi
Published on
Updated on

बॉलीवुडमधील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) ही सैफ अली खानची बहीण आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी आहे. सोहा अली खान सध्या चित्रपटांपासून दूर आहे, पण तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने (Acting) चाहत्यांचे मन जिंकलेले आहे. सोहा अली खानने आपले प्राथमिक शिक्षण दिल्लीतून केले आहे. पतौडी सोहा अली खानला स्टारडमचा वारसा मिळाला आहे. आजोबा इफ्तिखार आली खान पतौडी आणि वडील मन्सुर अली खान पतौडी हे देशातील प्रसिद्ध क्रिकेट कर्णधार राहिले आहेत. आई शरमुळा टागोर त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राहिल्या आहेत. सोहा त्या काही अभिनेत्रीपैकी एक आहे ज्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे.

सोहा अली खानने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समधून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. सोहा अली खानने 2004 मध्ये शाहिद कपूरच्या ' दिल मांगे मोर' या चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात केली. यानंतर ती ' प्यार मे ट्विस्ट', 'रंग दे बसंती', 'अहिस्ता-अहिस्ता','खोया खोया चांद', 'साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स' यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Birthday Special: Soha Ali Khan loves acting as well as books
तारक मेहता का उल्टा चश्मा मधील या फेमस अभिनेत्याचं निधन

बॉलीवुडशिवाय चित्रपटांशिवाय सोहा अली खानने हॉलीवुडमध्ये सुद्धा काम केले आहे. मेरिडियन लाईन्स, लाईफ गोज ऑन आणि मिडनाइट चिल्ड्रेनसह अनेक चित्रपाटांमध्ये भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटांशिवाय सोहाने लेखिका म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. तिने " द पेरील्स ऑफ बीइंग मॉडरेटली फेमस'( The Perils Of Being Moderately Famous) नावाचे पुस्तक लिहिले आहे. तिला पुस्तके वाचायला खूप आवडतात. सोहा आली खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने बॉलीवुड अभिनेता कुणाल खेमूसोबत 2015 मध्ये लग्न केले आहे. लग्नापूर्वी, सोहा अली खान आणि कुणाल खेमू बराच काल लीव्ह-इनमध्ये राहत होते. या दरम्यान तिने तिच्या रिलेशनशिपमुळे बऱ्याचवेळा सोशल मिडियावर चर्चेत आली होती. तिचा शेवटचा चित्रपट 2018 मधील साहेब बिवी आणि गँगस्टर 3 होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com