Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात नेहमीच ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत असतात. आता मात्र फिनाले जवळ येत असातना स्पर्धकांना बिग बॉसकडून आश्चर्याचे धक्के मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
अनेक स्पर्धकांचे इव्हिक्शन या आठवड्यात होणार आहे. चिंटू उर्फ समर्थ जुरेलचा प्रवास आता संपला आहे. कमी मतांच्या आधारे त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. शो मध्ये त्याची एंट्री वाइल्ड कार्ड म्हणून झाली होती. त्यानंतर ईशा मालवीय, समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये लव्ह ट्रँगल पाहायला मिळाला होता. मध्यंतरी या तिघांची मैत्रीदेखील पाहायला मिळाली तर त्यानंतर मोठ्या प्रमाणात भांडणेदेखील झाली. समर्थ आणि ईशाने अभिषेकच्या मानसिक आरोग्याची खिल्ली उडवल्यानंतर बिग बॉसच्या घरात मोठा ड्रामा पाहायला मिळाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हा विकेंड सलमानने नाही तर करण जौहरने होस्ट केला आहे. करणने समर्थ आणि आयशा या दोन स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतल्याचे म्हटले जात आहे. समर्थने अभिषेकला मानसिक त्रास दिल्याबद्दल आणि आएशाने मुन्नवर फारुकीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नॅशनल टीव्हीवर भाष्य केल्याने या दोघांना करण जौहरने कडक शब्दात सुनावले आहे.
दरम्यान, समर्थच्या जाण्याने कोणालाही फरक पडल्याचे दिसत नाही. कारण तो इतर स्पर्धकांच्या तुलनेत फार कमी कंटेट देत होता किंवा अभिषेक कुमार बरोबर भांडण्याशिवाय इतर काही करत नव्हता. आता समर्थ पाठोपाठ अरुणदेखील बाहेर बिग बॉसच्या घराबाहेर पडणार असल्याची माहीती समोर आली आहे.
आता बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक टिकून राहणार आणि कोणाला आधीच घराबाहेर पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सीझनची बिग बॉसची ट्रॉफी कोण आपल्या नावावर करणार हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय असणाकर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.