Bigg Boss 17 Promo: 'नवरा म्हणून तू अंकिताच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं...' करण जौहरकडून विकीवर प्रश्नांचा भडीमार

Bigg Boss 17 Promo: आता बिग बॉसच्या फिनालेला अवघे काही दिवस बाकी असताना शो मध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत.
Bigg Boss 17
Bigg Boss 17 Dainik Gomantak
Published on
Updated on

Bigg Boss 17 Promo: बिग बॉसच्या घरात नेहमीच काहीतरी घडत असते. कधी जोरजोरात भांडणे होताना दिसतात तर कधी मित्रांमधील प्रेम दिसते. कधी हेच मित्र शत्रू होताना दिसतात. स्पर्धकांच्या चूकीच्या वागण्याचा कधी कधी सलमान खानकडून क्लास घेण्यात येतो. सध्या बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक सुरु असून स्पर्धक अनेकवेळा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आता या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे.

या प्रोमोमध्ये करण जौहर सलमान खानऐवजी स्पर्धकांचा क्लास घेताना दिसत आहे. सुरुवातीला विकीला करणकडून अनेक गोष्टी सुनावल्या. करण विकीला म्हणतो-जेव्हा तुझी आई अंकिताकडे येऊन प्रश्न विचारते तेव्हा नवरा म्हणून तू तिच्या मागे उभं राहायला हवं. मी असे म्हणत नाही की तू तुझ्या आईच्या विरोधात काहीही बोलावे परंतु तू आपल्या पत्नीला अंकिताला काय झाले हे विचारलेच पाहिजे.

त्यानंतर अंकिता आणि विकी एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. विकी अंकिताला म्हणतो की काय झाले आहे, हे मला सांग. त्यानंतर अंकिता विकीला सांगते की, पप्पांनी माझ्या आईला फोन करुन असे विचारले की तू तुझ्या पतीला अशा प्रकारे चप्पल आणि बूट फेकून मारत होतीस का?यानंतर विकी म्हणाला- तुझे वडील या ठिकाणी असते तर त्यांनी काय केले असते? जेव्हा तुम्हाला काही गोष्टी हाताळता येत नाहीत, तेव्हा तू माझ्याकडे आणलेली गोष्ट राष्ट्रीय टीव्हीवर नीट दिसत नाही. ती गोष्ट मला कशी समजणार?

तर दुसरीकडे अभिषेकची आई घरात येते आणि तिला पाहून तो ढसाढसा रडू लागतो. ती ईशाशी एकटीने बोलते आणि तुझ्यासमोर मी अभिषेकला कधी कानाखाली मारली असे विचारते. नंतर त्याच प्रोमोमध्ये करण ईशाला मुनव्वरबद्दल चूकीचे आणि वाईट बोलल्याबद्दल खडसावतो.

आता बिग बॉसच्या फिनालेला अवघे काही दिवस बाकी असताना शो मध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. आता चाहत्यांचे मन जिंकत बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com