Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' चा हा सीझन शेवटच्या टप्प्यात असून 28 जानेवारीला संध्याकाळी ग्रँड फिनाले पार पडणार आहे. याआधी शोमध्ये आता 5 स्पर्धक आहेत जे विजेतेपदाच्या शर्यतीत एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत. मात्र, विजेता कोण होणार हे रविवारी रात्रीच कळणार असले तरी यासाठी तीन नावे आघाडीवर आहेत, त्यात मुनव्वर, मन्नारा आणि अभिषेक कुमार यांचा समावेश आहे. आता बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलिज झाला आहे. या प्रोमोमध्ये पुढील एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या या प्रोमोमध्ये काही जुने स्पर्धक घरात आलेले दिसत आहे. पूजा भट्टपासून ते 'बिग बॉस ओटीटी 2' मधील करण कुंद्रा, अमृता खानविलकर हे दोघे पुढच्या शोमध्ये दिसणार आहेत. त्याच वेळी, हे सर्वजण वेगवेगळ्या स्पर्धकांना आपला पाठिंबा दर्शवताना दिसत आहेत.
पूजा भट्ट मन्नाराला म्हणताना दिसते - मी तुझा क्राऊन फिक्स केला आहे. 'तुझा प्रवास खूप खडतर होता, तू स्वतःबद्दल जितका विचार करतेस त्यापेक्षा तू खूप मजबूत आहेस.'
करण कुंद्रा मुनव्वरला सपोर्ट करण्यासाठी घरात आला आहे. तो मुनव्वरला म्हणतो, चूका झाल्या, माफी मागितली. आपण सर्व माणूस आहोत आणि प्रत्येकजण चुका करतो. हे अनेक महान लोकांसोबत घडते. तुझा प्रवास छान झाला आहे.
मराठमोळी अभिनेत्री अंकिताला सपोर्ट करण्यासाठी घरात गेली असून ती म्हणते की, या शो मध्ये जितकी अंकिता रडली आहे तितक्याच वेळा मी आणि माझी आई घरी रडलो आहोत.
याशिवाय, ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धक दमदार परफॉर्म्स करताना दिसत आहेत. आता कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कोणता स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.