Bigg Boss 17 Promo: अन् आज मिळणार बिग बॉसचा विजेता! ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धकांची धमाल

Bigg Boss 17 Promo: सलमान खानसोबत भारती आणि हर्षपासून ते अब्दू रोजिक आणि इतर अनेक पाहुणे स्टेजवर दिसत आहेत.
Bigg Boss 17
Bigg Boss 17 Dainik Gomantak
Published on
Updated on

Bigg Boss 17 Promo: 'बिग बॉस सीझन 17' शेवटच्या टप्प्यात आहे आणि टॉप 5 स्पर्धक अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण मशेट्टी यांनी एकमेकांना चांगलीच टक्कर दिली आहे. ग्रँड फिनालेसाठी अवघे काही तास उरले असून प्रत्येकजण प्रत्येक क्षण मोजत आहे.

शेवटच्या एपिसोडमध्ये, करण कुंद्रा यांनी मुनव्वरला आपल्या चुकांवर पश्चात्ताप न करण्याचा सल्ला दिला, तर अमृता खानविलकरने अंकिता लोखंडे-विकी जैन यांच्या भांडणाबद्दल सांगितले. आता फिनालेआधी त्याचा प्रोमो रिजिज झाला आहे. या प्रोमोने अनेकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

सलमान खानसोबत भारती आणि हर्षपासून ते अब्दू रोजिक आणि इतर अनेक पाहुणे स्टेजवर दिसत आहेत. प्रत्येकजण खूप मजा करत आहे त्यानंतर तहलका-अरुण, अभिषेक, ईशा आणि समर्थ ते मन्नारा चोप्रा आणि विकी-अंकिता यांच्या डान्सची झलकही पाहायला मिळत आहे.

प्रोमोमध्ये ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट देखील रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. पाच अंतिम स्पर्धकांची झलक व्हिडिओच्या शेवटी दिसत आहे. यामध्ये मन्नारा, अंकिता, अभिषेक, मुनव्वर आणि अरुण ट्रॉफीसाठी आपापसात स्पर्धा करताना दिसत आहेत. प्रोमोच्या अगदी शेवटी, 'बिग बॉस 17' ट्रॉफीची एक झलक दिसत आहे, ती कोणाला मिळणार हे आज पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचे मन जिंकत कोणत्या स्पर्धकाने ही ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com