Bigg Boss 17: बिग बॉसचा १७ वा सीझन फिनालेच्या अगदी जवळ आला असताना या शो मध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात नुकताच टॉर्चर टास्क पार पडला, ज्याद्वारे नॉमिनेशन करण्यात येणार होते, मात्र घरात असे काही घडले ज्यामुळे संपूर्ण एक टीम नॉमिनेशन मध्ये गेल्याचे पाहायला मिळाले.
आता असे म्हटले जात आहे की, आएशा खान घरातून बाहेर पडली आहे. या नॉमिनेशन टास्कनंतर घरात काही फॅन्स आलेले दिसणार आहेत. जे या सदस्यांना मतदान करतील आणि ज्याला सगळ्यात कमी मते मिळतील तो स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या टास्कदरम्यान आएशा खानला सगळ्यात कमी मते मिळाली आहेत. मात्र अजूनही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने घराबाहेर कोण जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आएशा खानच्या घरात येण्याने मुनव्वर फारुकीच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घराबाहेरील आयुष्यावर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, नॉमिनेशनसाठी झालेल्या टास्कमध्ये घरातले सदस्य दोन टीममध्ये विभागले गेले होते. टीम ए मध्ये मुनव्वर फारुकी, अरुण, मन्नारा आणि अभिषेक हे चारजण होते. तर टीम बी मध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, आएशा खान आणि ईशा हे चारजण होते. टीम ए वर टीम बी ने मोठ्या प्रमाणात मिरची, थंड पाणी यांचा वापर केल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र त्यांची वेळ येताच त्यांनी घरातील सर्व साहित्य लपवून ठेवले, मिरची पावडर फेकून दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
आता बिग बॉसचा फिनाले जवळ येत असतानाच घरातील सदस्यांच्या नात्यात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. आता जनतेचे मन जिंकत कोणता स्पर्धत ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.