Bigg Boss 17: अन् गेम पलटला! ईशाच्या वडिलांनीच घेतली अभिषेकची बाजू

Bigg Boss 17: समर्थबद्दल त्यांनी कोणतेही मत मांडले नसले तरीही त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट न बोलता उदाहरणांतून समजावले आहे.
Bigg Boss 17
Bigg Boss 17Dainik Gomantak
Published on
Updated on

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात सतत ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात फॅमिली विक पाहायला मिळाला. स्पर्धकांचे कुटुंबिय घरात आले होते. बाहेरच्या जगात काय चालले आहे याबद्दल स्पर्धकांना कल्पनाही दिली.

गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात अभिषेक-ईशा-समर्थ यांच्यामध्ये मोठे भांडण पाहायला मिळाले होते. त्या भांडणात अभिषेकने समर्थच्या कानाखाली मारली होती. शिक्षा म्हणून अभिषेकला घराबाहेरदेखील पडावे लागले होते. मात्र नंतर त्याला घरात घेतले होते.

आता ईशाचे वडील जेव्हा घरात आले तेव्हा त्यांनी ईशाला अनेक गोष्टीबद्दल समजावले. तेव्हा त्यांनी अभिषेकला ज्या पद्धतीने ईशा आणि समर्थने पोक केले ते चूकीचे असल्याचे म्हटले आहे. समर्थबद्दल त्यांनी कोणतेही मत मांडले नसले तरीही त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट न बोलता उदाहरणांतून समजावले आहे.

आता ईशा आपल्या वागण्यात काय बदल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वीकेंडला समर्थ जुरैल घराबाहेर पडू शकतो. त्यानंतर गेममध्ये काय बदल होणार, कोणता स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, हा वीकेंड सलमान खानने होस्ट केला नाही तर त्याच्या जागी करण जौहरने होस्ट केला आहे. करण जौहरने विकी जैन आणि ईशा मालवीय यांचा चांगलाच क्लास घेतल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com