तब्बू की आंखे 'भूल भुलैया', हॉरर-कॉमेडी मोशन पोस्टर आउट

काही दिवसांपूर्वीच 'भूल भुलैया 2' चा टीझर प्रदर्शित झाला असून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Tabu’s First Look from Bhool Bhulaiyaa 2
Tabu’s First Look from Bhool Bhulaiyaa 2Instagram
Published on
Updated on

कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट 'भूल भुलैया 2' चे प्रमोशन सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्याला अनेक प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटामधील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर रिलीज होत आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीनंतर आता तब्बूचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. (Bhool Bhulaiyaa 2 Latest News)

तब्बूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये तब्बू (Tabu) खूप घाबरलेली दिसत आहे. तब्बूच्या मागे एक आरसा आहे, ज्यामध्ये डायनचे केसही दिसत आहेत. तब्बूचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना आवडला आहे. प्रेक्षकांमध्ये 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) पाहण्यासाठी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी कियाराने (Kiara Advani) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'भूल भुलैया 2' या चित्रपटामधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपली झलक प्रेक्षकांच्या समोर आणली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, या चित्रपटामध्ये ती रीतची भूमिका साकारणार आहे. या पोस्टवरून असे दिसते की, चित्रपटात कियाराच्या आत भूत किंवा आत्म्याची छाया असेल.

* यात काय विशेष असेल

चित्रपटाबद्दल बोलताना अनीसने पिंकविलाला सांगितले की हा चित्रपट त्याच्यासाठी खास आहे कारण हा त्यांचा पहिला हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिला 'भुल भुलैया' हा कॉमेडी असलेला सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता. ही एक हॉरर कॉमेडी आहे. लोकांना पहिल्या भागाची आठवण करून द्यावी, पण त्याचवेळी वेगळा अनुभव द्यावा, हे आव्हान आहे. चित्रपटात कार्तिक, कियाराशिवाय राजपाल यादव आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com