Bharati Singh: ...अन् भारती पोहचली दवाखाण्यात! स्वत:च सांगितलं नेमकं घडलं काय

Bharati Singh: अचानक मी मागे सरकले आणि बेडवरुन खाली पडले.
Bharati Singh
Bharati SinghDainik Gomantak

Bharati Singh: आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी भारती सिंह नेहमीच चर्चेत असते. आता मात्र मनोरंजनामुळे नाही तर दवाखाण्यात पोहचल्यामुळे भारती चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, बेडवरुन पडून भारतीला कंबरेमध्ये दुखणे सुरु झाले, त्यासाठी ती दवाखाण्यात पोहचली आहे. ती बेडवरुन कशी पडली याबद्दल तिनेच खुलासा केला आहे.

भारती सिंहने व्हिडिओ शेअर करत याबद्दल तिने सविस्तर माहीती दिली आहे. ती म्हणते- माझ्या डोक्याचे मसाज करणे चालू होते, अचानक मी मागे सरकले आणि बेडवरुन खाली पडले. पडल्यानंतर पहिल्यांदा मला आणि मसाजवालीला हसू आवरले नाही. मात्र नंतर कंबरेमध्ये वेदना सुरु झाल्या त्या इतक्या तीव्र होत्या की मला दवाखाण्यात जावे लागले, असे म्हणत भारतीने आपबीती सांगितली आहे.

पुढे ती म्हणते, जेव्हा दुसरा एखादा व्यक्ती असा पडतो तेव्हा मला खूप हसायला येते. याबाबतीत मी खूप उद्धट आहे, मी हसत हसत पडलेल्या व्यक्तीला उठवत असते मात्र माझे हसू आवरत नाही असे म्हणत भारती सिंहने आपली व्यथा व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे. दरम्यान, भारती सिंह ही भारतीय टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. टीव्हीशिवाय भारती आपल्या ब्लॉग्जच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिच्या पडण्यामुळे भारतीचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com