"भगवान अन् खुदा", सांप्रदायिक तणावादरम्यान मनोज वाजपेयींची कविता होतेय व्हायरलं

बॉलिवूडमध्ये मनोज वाजपेयींनी (Manoj Bajpayee) आपल्या अप्रतिम अभिनयामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Manoj Bajpayee
Manoj BajpayeeDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमध्ये मनोज वाजपेयींनी आपल्या अप्रतिम अभिनयामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. या व्हिडिओमध्ये मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) समाजात सांप्रदायिक सलोख्याचा संदेश देताना दिसत आहेत. व्हिडिओ आणि कवितेची संकल्पना चित्रपट निर्माते मिलाप झवेरी यांची आहे. मनोज वाजपेयी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) खूप पसंत केला जात आहे.

दरम्यान, देशभरात मध्य प्रदेश (Madhya Pradesh), गुजरात आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली यांसारख्या राज्यांमधून सांप्रदायिक वादाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. याचवेळी वाजपेयींच्या ही कविता मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. झवेरी यांच्या म्हणण्यानुसार, काही "दुर्दैवी घटनांमुळे" हा व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे, म्हणूनच त्याने तो त्याच्या ट्विटर हँडलवर शेअरही केला. झवेरी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, "अलीकडेच काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत, जिथे दोन समुदायांमध्ये संघर्ष झालाय. त्यामुळेच हा व्हिडिओ प्रासंगिक बनला आहे."

Manoj Bajpayee
शाहिद कपूरचा Jersey चित्रपट KGF 2 पुढे फेल?

तसेच, देशात हिंदू आणि मुस्लिम शांततेत राहतात. वाजपेयींचा हा व्हिडिओ देखील हाच संदेश देण्याचा प्रयत्न करतो," असे झवेरी यांनी म्हटले आहे. "सत्यमेव जयते" सारख्या व्यावसायिक चित्रपटांसाठी झवेरी यांना ओळखला जातं. "मरजावान" आणि "सत्यमेव जयते 2", या चित्रपटाचं देखील त्यांनी दिग्ददर्शन केलं आहे. मिलाप झवेरी यांनी हा व्हिडिओ मे 2020 मध्ये पहिल्यांदा शेअर केला होता, जेव्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com