बॉलीवुड कलाकारांची लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थिती

लतादिदींनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Lata Mangeshkar
Lata Mangeshkar Instagram /@ANI
Published on
Updated on

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या मधुर गाण्यांच्या माध्यमातून ठसा उमटविणाऱ्या जेष्ठ प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांचे निधन (Lata Mangeshkar passes away) झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादिदींना कोरोनासोबतच न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुबंईतील (Mumbai) ब्रीच कॅंडी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. (Lata Mangeshkar Death News Update)

शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकरांचं पार्थिव हलवण्यात आले आहे. लता दीदींच्या अंतिम संस्कारासाठी लाखो चाहते दर्शन घेण्यासाठी जमले आहेत. सर्व सामान्यांना लता दीदींचे दर्शन घेता येणार आहे. तसेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) अनुराधा पौडवाल, कैलाश खेर जावेद अख्तर,अमिर खान यासारखे अनेक बॉलीवुड कलाकरांनी लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क येथे उपस्थिती दर्शवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com