Article 370: अरुण गोवील नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसताच नेटकरी म्हणाले- 'शेवटी राम...'

Article 370: अभिनेत्री यामी गौतम ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
Arun Gowil
Arun GowilDainik Gomantak
Published on
Updated on

Article 370: राम म्हटले की अरुण गोवील आणि अरुण गोवील म्हटले की राम हे समीकरण चाहत्यांच्या मनात पक्के झाले आहे. दुरदर्शनवर प्रसारित होणारी रामायण ही मालिका प्रेक्षकांची आजही लाडकी मालिका आहे. आता मात्र अभिनेत्याने वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

आर्टिकल ३७० या चित्रपटात अरुण गोवील नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील त्यांचा लूक आणि अभिनय या दोन्ही बाबींनी त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ट्रेलर रिलिज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मिडियावर अरुण गोवील यांचे कौतुक करत शेवटी रामाशिवायच्या भूमिकेत तुम्हाला पाहण्याचा योग आला असे म्हटले आहे.

अभिनेत्री यामी गौतम ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन( Entertainment ) करताना दिसत आहे. 2 मिनिट 40 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये यामीच्या गुप्तचर अधिकारी म्हणून ती एका शक्तिशाली भूमिकेत दिसत आहे. किरणला नेत्यांमध्ये भाषण करताना पाहून सगळेच दंग झाले आहेत. अल्पावधीतच अरुण गोविलला पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. यामी गौतम आणि अरुण गोविलशिवाय टीव्ही अभिनेता किरण करमरकरही या चित्रपटात गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दरम्यान, आर्टिकल 370' मध्ये प्रियमणी, अरुण गोविल, वैभव तत्ववादी, स्कंदा ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार आणि इरावती हर्षे देव यांच्या भूमिका आहेत. आदित्य धर आणि मोनल ठकार यांनी लिहिलेली कथा, पार्श्वभूमी आणि संवाद आदित्य सुहास जांभळे आणि अर्जुन धवन यांनी लिहिले आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com