Arbaaz Khan: 'असे शेकडो भाऊ अन् मुलं ज्यांना...' नेपोटिझमवर अरबाजने केलेल्या वक्तव्याची चर्चा

Arbaaz Khan: इथे कोण कोणावरही उपकार करत नाही.
Arbaaz Khan
Arbaaz KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Arbaaz Khan talking about nepotism

बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून नेपोटिझमविषयी बोलले जात आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारदेखील याविषयी अनेकदा बोलताना दिसतात. आता अभिनेता अरबाज खाननेदेखील यावर वक्तव्य केले आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने नेपोटिझमविषयी आपले मत व्यक्त केले आहे.

अरबाज नेपोटिझमवर बोलताना म्हणाला की, तुमचे वडील एखाद्या क्षेत्रात असतील तर, तुम्हाला ब्रेक मिळण्यास मदत होऊ शकते. पण यामुळे कोणाचे करिअर होईल की नाही हे मला माहीत नाही. सोहेल आणि मी या बाबतीत इतर सुपरस्टार किंवा आमचा भाऊ सलमान खान( Salman Khan )इतके यशस्वी होऊ शकलो नाही.

आम्ही अजूनही इथेच आहोत आणि काम करत आहोत. इथे कोण कोणावरही उपकार करत नाही. पुढे बोलताना अभिनेता म्हणाला की, जर तुमचे वडील केवळ इंडस्ट्रीतीलच नाही तर एखाद्या खास क्षेत्रातले असतील तर तुमच्यासाठी त्या क्षेत्रातील दरवाजे खुले राहू शकतात. तुम्हाला तिथे काम करण्याची संधी मिळू शकते.

तुमचे वडील डॉक्टर असतील, वकील असतील. जे तुम्हाला त्या व्यवसायांमध्ये पुढे जाण्यास मदत करू शकतात. त्याचप्रमाणे एक अभिनेता म्हणून त्यांना इंडस्ट्रीत पाऊल ठेवणे त्यांच्या वडिलांमुळे शक्य झाले. त्याला ज्या व्यक्तीसोबत काम करायचे होते, त्याला भेटले. पण समोरचा व्यक्ती काम देईल की नाही याची शाश्वती नसते.

तुम्ही बॉलीवूड( Bollywood )च्या दिग्गजाचे नातेवाईक आहात की नाही हे महत्त्वाचे नाही. तुमचा पडद्यावरचा अभिनय पाहून प्रेक्षक खूश नसतील तर कोणताही भाऊ किंवा वडील, नातेवाईक तुम्हाला चित्रपटात भूमिका देणार नाही. त्यामुळे एखादा अभिनेता यशस्वी झाला तर त्याचे कारण वारश्यामुळे मिळालेल्या फायद्यामुळे आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. कारण अनेक सुपरस्टार्स अशा टप्प्यातून जातात जिथे त्यांचे 10 चित्रपट फ्लॉप होतात आणि काय करावे ते समजत नाही. अरबाज पुढे म्हणाला की, जर काही अभिनेत्यांनी एखाद्याचा मुलगा किंवा भाऊ म्हणून यश मिळवले असेल तर असे शेकडो भाऊ आणि मुलं आहेत ज्यांना अपयश आले आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षात नेपोटिझमवर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. अनेकदा यावर टीकादेखील होताना दिसते. आता अरबाज खानने नेपोटिझमवर केलेल्या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com