Anurag Kashyap on PM Modi: "आता गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत !" PM मोदींना उद्देशुन अनुराग कश्यप हे काय म्हणाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत दिग्दर्शक अनुराग कश्यपने एक मोठं विधान केलं आहे.
Anurag Kashyap
Anurag KashyapDainik Gomantak
Published on
Updated on

Anurag Kashyap on PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सांगितले की, चित्रपटांवर अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. आता चित्रपट दिग्दर्शक अनुराग( Anurag Kashyap) कश्यपने पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबईतील जुहू थिएटरमध्ये गुरुवारी, 18 जानेवारी रोजी त्याच्या 'ऑलमोस्ट लव्ह विथ डीजे मोहब्बत' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अनुरागने पीएम मोदींच्या विधानावर भाष्य केले. अनुराग म्हणतो,  "हे चार वर्षांपूर्वी सांगितले असते तर फरक पडला असता. आता गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत".

अनुराग कश्यप त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. दरम्यान, प्रश्नोत्तरादरम्यान त्यांना विचारण्यात आले की, पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, जर एखादा नेता एखाद्या चित्रपटाबाबत वक्तव्य करू लागला तर तेच दिवसभर टीव्हीवर चालते. राजकारण्यांनी अशी टिप्पणी करणे टाळावे. 

. अशा स्थितीत बॉलीवूडवर बहिष्कार टाकणाऱ्यांचा प्रभाव कमी होईल का, असंही त्याला विचारलं तेव्हा अनुरागने अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. अनुराग म्हणाला, "लोक पंतप्रधानांचा संदेश गांभीर्याने घेतील का? कारण एवढ्या मोठ्या नेत्याने यापूर्वी कधीही असे वक्तव्य केले नव्हते".

अनुराग कश्यप पुढे म्हणाला, "जर ते (पीएम मोदी) चार वर्षांपूर्वी हेच बोलले असते तर खरोखरच फरक पडला असता. आता मला वाटत नाही की कोणीही स्वतःच्या लोकांवर नियंत्रण ठेवू शकेल. आता गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. 

याचा अर्थ आता कोणी कोणाचे ऐकेल असे नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या मौनाने पूर्वग्रह आणि द्वेषाला सामर्थ्यवान बनवता तेव्हा ते अधिक शक्तिशाली होते. आजही ते इतके शक्तिशाली झाले आहे की लोक रस्त्यावर आले आहेत ".

Anurag Kashyap
Rakul Preet Singh: अभिनेत्री रकुल प्रीत सिंह जेव्हा सोशल मीडियावर चर्चेत येते

दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या मोकळ्या आणि थेट बोलण्याने सर्वपरिचित आहे. त्याच्या या बोलण्याला नक्कीच महत्त्व आहे. कारण सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या अत्यंत कमी लोकांमध्ये अनुरागचं नाव घ्यावं लागेल.

एक दिग्दर्शक म्हणुन नक्कीच त्याच्या विचाराला महत्त्व आहे ;कारण पठडीच्या बाहेरचा सिनेमा बनवणारा दिग्दर्शक म्हणुन अनुराग कश्यपच्या नावामागे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com