दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात अनुपम खेर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या कामाचे खूप कौतुकही झाले अलीकडेच, अनुपम यांनी अभिनेता प्रकाश राज यांच्या चित्रपटाबद्दल केलेल्या टीकात्मक प्रतिक्रियांना उत्तर दिले. केरळ फिल्म फेस्टिव्हल २०२२ दरम्यान राज यांनी 'द काश्मीर फाइल्स' वर भाष्य केले.
2022 मध्ये मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर हिट ठरलेल्या 'द कश्मीर फाइल्स'ला अनेक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सुरू झालेले वाद अजूनही शांत होण्याचे नाव घेत नाहीत.
काश्मिरी हिंदूंच्या पलायनाची कहाणी आणि त्यांच्यासोबत घडलेल्या वेदनादायक घटना पडद्यावर आणणाऱ्या 'द काश्मीर फाइल्स'च्या संदर्भात लोक दोन गटात विभागले गेले. या चित्रपटाबाबत आरोप-प्रत्यारोपांची मालिका अजूनही सुरूच आहे. यापूर्वी प्रकाश राज यांनी या चित्रपटाला बकवास म्हटले होते. यावर अभिनेते अनुपम खेर यांनी आपले उत्तर दिले आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात अनुपम खेर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या कामाचे खूप कौतुकही झाले.
अलीकडेच, अनुपम यांनी अभिनेता प्रकाश राज यांच्या चित्रपटाबद्दल केलेल्या टीकात्मक प्रतिक्रियांना उत्तर दिले. ते म्हणाले की त्यांचा नेहमीच प्रामाणिकपणावर विश्वास आहे आणि इतर लोक त्यांना पाहिजे त्यावर विश्वास ठेवू शकतात.
अनुपम म्हणतात, 'लोक स्वतःच्या स्टेटसबद्दल बोलतात. काही लोकांना आयुष्यभर खोटं बोलावं लागतं. काही लोक आयुष्यभर सत्य बोलतात. मी अशा लोकांपैकी एक आहे जे आयुष्यभर सत्य बोलून जगले.
ज्याला खोटं बोलून जगावं लागतं, ती त्याचीच इच्छा असते. हे उत्तर देताना अनुपम खेर यांनी प्रकाश राज यांचे नाव घेतले नाही पण त्यांचा चाहत्यांना नक्कीच लक्षात आलं असेल.
केरळ फिल्म फेस्टिव्हल २०२२ दरम्यान प्रकाश राज यांनी 'द काश्मीर फाइल्स' वर भाष्य केले. यासोबतच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्याच्या खोट्या दाव्याचीही त्यांनी खिल्ली उडवली.
प्रकाश राज म्हणाले होते, 'द कश्मीर फाइल्स हा बकवास चित्रपटांपैकी एक आहे. पण त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरीही त्यांच्यावर थुंकतात, पण तरीही ते निर्लज्ज आहेत.या चित्रपटाचा दिग्दर्शक अजूनही म्हणतोय, मला ऑस्कर का मिळत नाही? त्याला भास्करही मिळणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.