Annu Kapoor: चित्रपटापेक्षा भन्नाट लव्हस्टोरी! घटस्पोटानंतर दुसरं लग्न केलं तरीही पहिल्या पत्नीला लपून-छपून भेटणं थांबवलं नाही

Annu Kapoor: मात्र बॉलीवूडमध्ये आधीपासून एक अनिल कपूर असल्याने त्यांनी आपले नाव बदलून अन्नू कपूर असे ठेवले.
Annu Kapoor
Annu KapoorDainik Gomantak
Published on
Updated on

Annu Kapoor: बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे बहुगुणसंपन्न आहेत. जे अभिनय करत असतात, गायक असतात, लिहतात, दिग्दर्शन करतात आणि काहीजण नृत्यामध्येदेखील माहिर असतात. अशा कलाकारांपैकी एक म्हणजे अन्नू कपूर हे आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

अभिनेत्याचे खरे नाव

20 फरवरी 1956 ला भोपाळमध्ये जन्मलेल्या अन्नू कपूर यांचे खरे नाव अनिल कपूर असे आहे. मात्र बॉलीवूडमध्ये आधीपासून एक अनिल कपूर असल्याने त्यांनी आपले नाव बदलून अन्नू कपूर असे ठेवले.

अन्नू कपूर हे असे अभिनेते आहेत त्यांनी चित्रपटांबरोबरच, मालिकांमध्येदेखील काम केले आहे. ते गायक आहेत, रेडिओ जॉकी आहेत, टीव्ही रिप्रेजेंटर म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. जवळजवळ ४० वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत.

अन्नू कपूर यांचे चित्रपट

1983 ला श्याम बेनेगाल यांनी दिग्दर्शित केलेल्या मंडी या चित्रपटांमधून त्यांनी बॉलीवूडमध्ये पहिले पाऊल टाकले होते. त्यानंतर त्यांनी ‘राम लखन’, ‘डर’, ‘जमाई राजा’, ‘काला पानी’, ‘पायल’, ‘अर्जुन पंडित’, ‘बदलापुर बॉयज’, ‘घायल, 'सब मोह माया है', 'नॉन स्टॉप धमाल', 'द शौकिन्स', 'ड्रीम गर्ल', 'ड्रीम गर्ल २', 'जॉली एलएलबी' , 'जॉली एलएलबी २', 'विकी डोनर', 'सात खून माफ', 'ड्राय डे', 'चेहरे' अशा १०० पेक्षा जास्त चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

चित्रपटातील कथेसारखीच अन्नू कपूर यांची प्रेम कहाणी

अन्नू कपूर यांची तीन लग्ने झाली आहेत. 1992 मध्ये त्यांनी अनुपमासोबत पहिले लग्न केले. अनुपम आणि अन्नू कपूर यांच्या वयात १३ वर्षांचा फरक होता. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या नात्यात चढउतार आले. जेव्हा त्यांच्यातील भांडण खूप वाढले तेव्हा त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

त्यांचे एकमेकांबरोबर पटत नसल्याने दोघेही वर्षभरातच एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांनी घटस्पोट घेतला. त्यानंतर त्यांच्या आय़ुष्यात अरुणिता मुखर्जी आल्या. त्यांनी एकमेकांबरोबर लग्न केले. मात्र अरुणिताबरोबर लग्न झाल्यानंतरदेखील ते अनुपमाला विसरले नाहीत. ते अनुपमाला लपूनछपून भेटत राहिले. जेव्हा अरुणिताला हे कळले तेव्हा तिला वाईट वाटले आणि तिने अन्नू कपूरला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अन्नू कपूर आणि अरुणिताचा घटस्फोट झाला तेव्हा अन्नू कपूर आणि अनुपमा यांनी 2008 मध्ये पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.

दरम्यान, चित्रपट-टीव्ही मालिकांशिवाय अन्नू कपूर यु-ट्यूब, इंस्टाग्राम, एक्स या सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांबरोबर संवाद साधत असतात. त्यांच्याबरोबर ते जोडले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com