Vicky Jain: रिॲलिटी शो 'बिग बॉस सीझन 17' आता संपला आहे. पण तरीही आता या शोची स्पर्धकांची जोरदार चर्चा होत आहे. या सीझनमधील गाजलेल्या घटनांसोबत याच्याशी निगडित लोकांची नावेही वारंवार मीडियात येत आहेत. सीझन 18 कधी येईल याबद्दल अजून कोणतीही माहिती नाही. पण त्याच्या ओटीटी सीझन 3 ची जोरदार चर्चा सुरु आहे. आता या सीझनसाठी यासाठी विकी जैनला अप्रोच करण्यात आले आहे.
बिग बॉसच्या १७ व्या सीझनमध्ये विकी जैनने आपल्या पत्नीसोबत म्हणजेच अंकिता लोखंडेसोबत घरात प्रवेश केला होता. सुरुवातीला अंकिताचा नवरा अशी त्याची ओळख असली तरी त्याने या घरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तो टॉप ६ स्पर्धकांमध्ये होता. प्रेक्षकांनादेखील त्याचा गेम आवडत असल्याचे पाहायला मिळाले होते. बिग बॉसच्या घरातील त्याला मास्टरमाइंडदेखील म्हटले गेले. अंकिता आणि त्याच्या नात्याच्या भरपूर चर्चाही झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
आता बिग बॉस ओटीटी सीझन ३ मध्ये जाण्यासाठी विकी ऑफर स्विकारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याने ही ऑफर स्विकारली तर त्याला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात पाहणे प्रेक्षकांसाठी मेजवाणी असणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.