Animal Box Office Collection: नवव्या दिवशीसुद्धा 'अ‍ॅनिमल'चा धुमाकूळ तर सॅम बहाद्दूर...

Animal Box Office Collection: 'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंह' नंतर संदीप रेड्डी वंगा यांचा तिसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
Animal Box Office Collection
Animal Box Office CollectionDainik Gomantak
Published on
Updated on

Animal Box Office Collection: रणबीरचा चित्रपट 'अॅनिमल' चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावर अनेक आरोप-प्रत्यारोप होत असूनही चित्रपटाची कमाई मात्र तूफान होताना दिसत आहे. चला जाणून घेऊयात प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने किती कमाई केली आहे.

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ सुरूच आहे . संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने 9 दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल स्टारर या चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटांच्या जगात इतिहास रचला आहे. 'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंह' नंतर संदीप रेड्डी वंगा यांचा तिसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटासोबतच प्रदर्शित झालेला विक्की कौशलचा 'सॅम बहादूर' हा चित्रपट 'अ‍ॅनिमल'मुळे चांगलाच त्रस्त झाला आहे. भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात कमी यशस्वी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

'अॅनिमल'ने पहिल्या दिवशी 63.8 कोटींची कमाई केली, जो आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट आहे. 'जवान' नंतर 'अॅनिमल'ने सर्वाधिक कमाई केली आणि मागील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, अॅनिमलने नवव्या दिवशी 37.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशाप्रकारे, एकूणच चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 400 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 398.53 कोटींची कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com