Amitabh Bachchan Viral Video: 'फक्त तुमचीच हिम्मत...' व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

Amitabh Bachchan Viral Video: आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर कुटुंबातील सदस्य, कलाकार आणि चाहत्यांनी मजेशीर कंमेंट केल्या आहेत.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Dainik Gomantak

Amitabh Bachchan Viral Video: बॉलीवूडचे बीग बी अमिताभ बच्चन आजही चर्चेचा विषय असतात. आता अमिताभ बच्चन एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. हा व्हिडिओ त्यांनी स्वत:च काढला असून तो आता चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

एका सेटवरील हा व्हिडिओ स्वत: अमिताभ बच्चन यांनी रेकॉर्ड केला आहे. यामध्ये जया बच्चनदेखील त्यांच्यासोबत दिसून येत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला जया बच्चन यांचा चेहरा गंभीर दिसून येत आहे. मात्र बीग बी जसा कॅमेरा त्यांच्याजवळ घेऊन जातात तसे त्यांच्या चेहऱ्यावर हसू येताना दिसत आहे. आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर कुटुंबातील सदस्य, कलाकार आणि चाहत्यांनी मजेशीर कंमेंट केल्या आहेत.

बिपाशा बसू, नव्या नंदा, श्वेता बच्चन, मौनी रॉय यांच्यासह अनेक प्रसिद्ध स्टार्सनी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले की, 'जया बच्चन यांना कॅमेरात कैद करण्याची हिम्मत फक्त अमित बच्चन मध्ये आहे.' दुसर्‍याने कमेंट केली, 'तुमची बायको क्वचितच हसते. तुम्हीच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता.' दुसर्‍याने लिहिले की, 'मी कधीही त्याच्या रागावलेल्या चेहऱ्यावर आनंद किंवा हसू पाहिले नाही.'

५० वर्षापूर्वी ३ जून १९७३ ला अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याबरोबर लग्न केले होते. ७० च्या दशकात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याबद्दल बोलले जात होते. 'दो अनजाने', 'खून पसीना', 'गंगा की सौगंध' सारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्याकडून यावर कधीही कोणतेही वक्तव्य केले गेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com