Ameesha Patel On Anil Sharma: सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेल्या गदर 2 ने बॉक्स ऑफीसवर कमाल केल्याचे दिसत आहे. 22 दिवसात 487.65 कोटींची कमाई केली आहे. आता चित्रपटातील कलाकार हे यश साजरे करताना दिसत आहेत.
गदर २ च्या निमित्ताने चित्रपटातील कलाकारदेखील चर्चेत आले आहेत. गदर २ ची मुख्य अभिनेत्री अमिषा पटेल आपल्या मुलाखतीदरम्यान अनेक खुलासे करताना दिसत आहे. आता चक्क तिने गदर २ चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर आरोप केले आहेत.
एका मुलाखतीदरम्यान तारा आणि सकिनाच्या भूमिकेबद्दल बोलताना तिने म्हटले आहे की, अनिल शर्मा यांना तारा यांच्या भूमिकेत सनी देओलऐवदजी गोविंदाला घ्यायचे होते तर सकिनासाठी त्याना ममता कुलकर्णी यांना कास्ट करायचे होते.
मात्र झी स्टुडिओजला सनी देओल ताराच्या भूमिकेत हवे होते. मी झी स्टुडिओ आणि सनी देओल( Anil Deol )मुळेच गदर चित्रपटात काम केल्याचे अमिषा पटेलने म्हटले आहे. पुढे ती असेही म्हणते चित्रपटातील संवाद शक्तीमान यांनी लिहले आहेत, अनिल शर्मांनी नाही, हे देखील मी या चित्रपटात काम करण्याचे कारण आहे.
अनिल शर्मा आणि अमिषा पटेल यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. गदर च्या शूटिंगपासूनच त्यांच्या वादविवाद दिसून येतात. ती म्हणते, अनेकजण मला अनिल शर्मा आणि माझ्यामध्ये कसे नाते आहे असा प्रश्न विचारतात. मी अशा सगळ्या लोकांना सांगू इच्छित आहे की, आमच्यामध्ये वाद आहेत, आमचे नाते कधीही चांगले नव्हते मात्र ते माझ्या कुटुंबियाप्रमाणे आहेत आणि पुढेही राहतील.
अनिल शर्मा यांच्या मुलाबद्दल अभिनेता उत्कर्ष शर्माबद्दल बोलताना तिने म्हटले आहे की उत्कर्ष चांगला मुलगा आहे, प्रेमळ आहे. मात्र माझी अशी इच्छा आहे की त्याला बॉलीवूडमधील मोठ्या दिग्दर्शकांनी त्याला साइन करावे, उत्कर्षने फक्त त्याच्या वडिलांच्या चित्रपटात काम करु नये असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.
पुढे ती म्हणते, अनिल शर्मानी गदर २ मध्ये आपल्या मुलाला प्रमोट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रेक्षकांनी तारा आणि सकीनावर प्रेमाचा वर्षाव केला असेही अमिषा पटेलने म्हटले आहे.
दरम्यान, गदर २ च्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर अमिषा पटेलने टेक्नीशियंसचे पेमेंट न करण्याचा आणि मिसमॅनेजमेंटचा आरोप केला होता. मात्र अनिल शर्मा आणि अमिषा पटेल यांच्या मतभेदानंतरदेखील त्यांनी गदर आणि गदर २ हे दोन्ही चित्रपट एकत्र पूर्ण केले आहेत. गदर प्रमाणेच गदर २ लादेखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.