सध्या बॉलीवूडपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढत आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकही मोठ्या पडद्यापेक्षा ओटीटीवर अधिक भर देत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपट दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांनी OTT च्या Amazon Prime Video सोबत भागीदारी केली आहे. साजिद नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटने Amazon Prime Video सोबत हातमिळवणी केली आहे. या भागीदारीनंतर आता अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. एवढेच नाही तर, हे सहकार्य देशभरातील OTT प्रेक्षकांसाठी आणि 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील चाहत्यांसाठी सर्वात मोठे बॉलिवूड चित्रपट आणणार आहे.
OTT सह भागीदारीनंतर, आता अनेक मनोरंजक चित्रपट देखील Amazon प्राइम व्हिडिओवर रिलीजसाठी तयार झाले आहेत. या ऐतिहासिक भागीदारीअंतर्गत एक-दोन नव्हे तर सहा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांच्या नावांमध्ये 'बावल', 'सांकी', 'बागी 4' यांचा समावेश आहे. प्रथम हे चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होतील. त्यानंतरच त्यांचे स्ट्रीमिंग ओटीटीवर केले जाईल.
या चित्रपटांशिवाय आणखी काही चित्रपट आहेत, ज्यांच्या नावांची घोषणा व्हायची आहे. त्याच वेळी, या यादीमध्ये बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या एका चित्रपटाचा देखील समावेश आहे. जो आजकाल त्याच्या 'भूल भुलैया 2' चित्रपटासाठी चर्चेत आहे. पण, सध्या तरी त्याच्या ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. उर्वरित चित्रपटांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.(amazon prime videos collaborate with nadiadwala grandson entertainment to bring you best blockbuster movies)
तरण आदर्श आणि Amazon चे ट्विट येथे पहा
ट्रेड ॲनालिस्ट करण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. याशिवाय Amazon Prime Video ने देखील OTT प्लॅटफॉर्मच्या चाहत्यांना त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
NGE चे जागतिक स्थान
नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी ही स्ट्रीमिंग सेवा जगभरातील एकमेव जागतिक स्थान असेल. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेते आणि अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. ज्यामध्ये वरुण धवन, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, अहान शेट्टी आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.