Pusha 2 Dialogue : या व्हायरल व्हिडीओमध्ये पुष्पा भाऊंनी लीक केला डायलॉग...

अभिनेता अल्लू अर्जूनने त्याच्या आगामी पुष्पा 2 चित्रपटातला एक डायलॉग बोलून दाखवला आहे, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
Pusha 2 Dialogue
Pusha 2 DialogueDainik Gomantak
Published on
Updated on

Allu Arjun Viral Video : अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करुन गेला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. आता 2024 मध्ये चित्रपटाचा पार्ट 2 रिलीज होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. चाला पाहुया या व्हिडीओची इतकी का चर्चा रंगलीय.

पुष्पा 2 चा महत्त्वाचा डायलॉग लीक

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' म्हणजेच 'पुष्पा: द रुल' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. अभिनेत्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2021 मध्ये आलेला त्याचा ब्लॉकबस्टर पुष्पा: द राइज - भाग 1 हा सिक्वेल आहे. पुढच्या वर्षी रिलीज होण्यासाठी आणि चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमात त्याच्या आगामी सिक्वेलचा एक महत्त्वाचा डायलॉग लीक केला आहे.

बेबी चित्रपटाची सक्सेस पार्टी

होय, या अभिनेत्याने हैदराबादमध्ये 'बेबी' चित्रपटाच्या सक्सेस पार्टींमध्ये 'पुष्पा 2'चे डायलॉग लीक करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. अल्लू अर्जुन म्हणाला, "मी पुष्पा 2 बद्दल बोलण्यासाठी आलो नाही, परंतु मी स्वतःला चित्रपटातील डायलॉग ऐकवण्यापासून रोखू शकत नाही."

Pusha 2 Dialogue
Kamal Hasan on Sholay : "शोले पाहिल्यावर मला झोप लागली नाही" कमल हासन असं का म्हणाले?

डायलॉग असा आहे

यानंतर अल्लू अर्जुनने तेलुगूमध्ये पुष्पा 2 चा डायलॉग बोलुन दाखवला, ज्याचा मराठीत अनुवाद असा होईल, "सर्व काही एका नियमाने होईल, तो म्हणजे पुष्पा नियम." त्याचवेळी या कार्यक्रमाचा व्हिडिओ ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, नेटिझन्स त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com