Darlings Teaser Out |Alia Bhatt
Darlings Teaser Out |Alia BhattInstagram

Darlings Teaser Out: आलियाचा दमदार अंदाज, ‘डार्लिंग्स’ चा सस्पेन्सफुल टीझर तुम्ही पाहिलात का?

Darlings Teaser Out: हा चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.
Published on

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी आलियाने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करून चाहत्यांना गुड न्युज दिली. दुसरीकडे, तिच्या आगामी चित्रपटांची रांग लागली आहे. ज्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. ‘ब्रह्मास्त्र’ व्यतिरिक्त आलिया ‘डार्लिंग्स’ (Darlings) नावाच्या आणखी एका चित्रपटात दिसणार असून त्याचा टीझरही आता रिलीज झाला आहे.

चित्रपटाचा टीझर खूपच मजेशीर आहे. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये सस्पेन्सने भरलेली अनेक दृश्ये आहेत. या चित्रपटात (Movie) आलियाशिवाय विजय वर्मा, शेफाली शाह, रोशन मॅथ्यू हे देखील दिसणार आहेत.

या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊस आणि आलियाचे प्रोडक्शन हाऊस इंटरनल सनशाइन यांनी केली आहे. हा चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com