'Rocky Aur Rani Ki Prem Kahani' च्या शूटसाठी आलिया राजस्थानला रवाना

आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच राजस्थानला एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार आहे.
Alia Bhatt
Alia Bhatt Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवुडमधील प्रसिद्ध नवे जोडपे रणबीर(Ranbir Kapoor) आणि आलिया यांच्या लग्नाला एक आठवडाही झालेला नाही. बी-टाऊनच्या या प्रसिद्ध जोडप्याच्या लग्नाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू होती. आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. 14 एप्रिल रोजी रणबीर-आलियाचे लग्न मुंबईत पार पडले. या लग्नाला कुटुंबासोबतच काही जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी रणबीर कपूर कामावर परतताना दिसला. आता बातम्या येत आहेत की कपूर कुटुंबातील नव वधूही लवकरच कामावर परतण्याच्या तयारीत आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच राजस्थानला एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणार आहे. (Alia Bhatt Upcoming Movie)

* आलिया भट्ट करणार या चित्रपटाचे
आलिया भट्ट तिच्या आगामी चित्रपट 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' च्या राहिलेल्या भागांचे शूटिंग करायला राजस्थानला जाणार आहे. पिंकविलाच्या ताज्या रिपोर्टनुसार, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट 'जैसलमेर' या चित्रपटामध्ये एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांसारखे दिग्गज कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आहे.

Alia Bhatt
ऐश्वर्या रायने 'कुछ कुछ होता है'ची ऑफर का फेटाळली? कारण आले समोर

रणबीर लग्नाच्या दोन तीन दिवसानंतरच कामासाठी बाहेर पडताना दिसला. 14 एप्रिल 2022 रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आज त्याचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यावेळी तो एका चित्रपटाच्या (Movie) शुटींगसाठी बाहेर पडल्याचे दिसुन येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर त्याच्या कारमधून अंधेरीमध्ये आला आहे. त्यानं ब्ल्यु रंगाचा शर्ट आणि बेगी पँट परिधान केली होती. अनेक फोटोग्राफर्सनी रणबीरला स्पॉट करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com