Brahmastra: रणबीर कपूर चढला 'डान्स का भूत', पाहा व्हिडीओ

Brahmastra Song Dance Ka Bhoot: रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'डान्स का भूत' हे गाणे रिलीज झाले आहे.
Brahmastra Song
Brahmastra SongInstagram
Published on
Updated on

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'ब्रह्मास्त्र' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. पण त्याआधी चित्रपटाचा ट्रेलर आणि एकामागून एक रिलीज होत असलेली गाणी यामुळे चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. 'केसरिया'च्या बंपर हिटनंतर 'देवा देवा' आणि आता 'डान्स का भूत' हे गाणेही रिलीज झाले आहे. हे गाणे फक्त रणबीर कपूरवर चित्रित करण्यात आले असून आलिया भट्टने हे गाणे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. (Brahmastra Song Dance Ka Bhoot Out)

आलिया भट्टने (Alia Bhatt) रणबीर कपूरचा 'डान्स का भूत' हे गाणे शेअर करत लिहिले, 'उफ जरा त्याचा डान्स पहा.' आलिया भट्टही रणबीरच्या डान्सची क्रेझी झाली आहे. या गाण्याला अरिजित सिंगने आवाज दिला असून अमिताभ भट्टाचार्य यांचे बोल आहेत. गाण्यात रणबीर कपूर बेभान होऊन नाचतांना दिसत आहे.

Brahmastra Song
Raju Srivastava Health: श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, आज 15 दिवसांनी आले शुद्धीवर

अयान मुखर्जी दिग्दर्शित पौराणिक कथांवर आधारित या चित्रपटात रणबीर कपूर व्यतिरिक्त आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन देखील दिसणार आहेत. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात (Movie) शस्त्रांची देवता असलेल्या 'ब्रह्मास्त्र'च्या (Brahmastra) शक्तींना साकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

'ब्रह्मास्त्र' पॅन इंडिया स्तरावर तीन भागात रिलीज होणार आहे. रणबीर कपूरसोबत आलिया भट्टची जोडी पहिल्यांदाच चित्रपटाच्या पडद्यावर दिसणार आहे. या नव्या जोडीला चित्रपट पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. रणबीरने (Ranbir Kapoor) 'ब्रह्मास्त्र'चे प्रमोशन सुरू केले आहे. आजकाल अभिनेता चेन्नईमध्ये त्याचा सहकलाकार नागार्जुनसोबत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. 'ब्रह्मास्त्र' 9 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com