दादासाहेब फाळके पुरस्कार' हा सिनेविश्वातील महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मुंबईतमोठ्या जल्लोषात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटामधील भूमिकेसाठी तसेच सिनेविश्वातील योगदानासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे तर दुसरीकडे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरला 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
मुंबईत पार पडलेल्या 'दादासाहेब फाळके पुरस्कार' सोहळ्यात आलिया भट्टने हजेरी लावली होती. रणबीर कपूर आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर (Mumbai) असल्याने तो या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहू शकसा नाही. त्यामुळे आलियाने रणबीरच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला.
आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामध्ये तिने सेक्स वर्कर-माफिया डॉनची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. देशातच नाही तर विदेशातही हा चित्रपट पसंतीस पडला.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट 2022 मध्ये सुपरहिट ठरला. त्यामुळे या सिनेमातील भूमिकेसाठी आलियाला दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
तर दुसरीकडे अर्यान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात रणबीरने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्यामुळेच त्याला या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. एकंदरीतच या पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि आलियाच्या फोटोंनी मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुरस्कार सोहळ्यात आलियाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानदेखील आलियाने पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या. तर पुरस्कार सोहळ्यात रेखाने सोनेरी रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती.
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिंटींनी हजेरी लावली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.