Alia Bhatt: रश्मिका, काजोलनंतर आलिया ठरली डीपफेक व्हिडिओची शिकार

Alia Bhatt: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे.
Alia Bhatt
Alia BhattDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही दिवसांपासून डीपफेक व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले असून आता रश्मिका मंधाना, काजोल नंतर आता आलिया भट्टचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.

आलिया ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्यासोबत असे होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या नवीन डीप-फेक व्हिडिओमध्ये बी-टाउन स्टार आलिया भट्टसारखी दिसणारी एक मुलगी आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे.

व्हिडिओमध्ये एक मुलगी निळ्या फुलांचा को-ऑर्डर सेट परिधान करून कॅमेऱ्याकडे अश्लील हावभाव करताना दिसत आहे. मात्र, नीट पाहिल्यास, व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी आलिया नाही, हे सांगता येईल. अभिनेत्रीचा चेहरा दुसऱ्याच्या शरीरावर एडिट करण्यात आला आहे.

Alia Bhatt
Vikrant Massey: 12th फेल चित्रपटाची ऑस्करमध्ये एंट्री? अभिनेत्याने केला खुलासा

यापूर्वी, रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आल्यानंतर आणि व्हायरल झाल्यानंतर तिने तिची चिंता व्यक्त केली होती. रश्मिकाने ट्विट करत म्हटले होते की, असे घडणे केवळ माझ्यासाठीच नाही तर आपल्या प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे, जे आज तंत्रज्ञानामुळे खूप नुकसानास बळी पडत आहेत.

आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब आणि माझे रक्षण करणाऱ्या मित्रांची ऋणी आहे. पण शाळेत किंवा कॉलेजमध्ये माझ्यासोबत हे घडलं असतं तर हे सहन करणे अशक्य होते.

कतरिना कैफचे फोटो एडिट

कतरिना कैफच्या बाबतीतही, तिच्या 'टायगर 3' चित्रपटातील अभिनेत्रीचा बदललेला फोटो व्हायरल झाला होता. मूळ व्हिडिओमध्ये बॉलीवूड स्टार टॉवेल परिधान केलेल्या स्टंटवुमनशी लढत असल्याचे दाखवले होते, तर एडिटिंगनंतर तिने टॉवेलऐवजी लो-कट पांढरा टॉप आणि मॅचिंग बॉटम घातलेला दाखवला होता.

प्रगत होत चाललेल्या तंत्रज्ञानाचा मानवाला अनेकप्रकारे फायदा होणार असला तरी आता तंत्रज्ञानाच्या चूकीच्या वापराचे गंभीर परिणाम होताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com