
Alia Bhatt Kapoor Name Change: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टने यावर्षीच्या कान्स २०२५ फिल्म फेस्टिव्हलमध्ये शानदार पदार्पण केले. 'ल'ओरिअल'ची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून या प्रतिष्ठित सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या आलियाने तिच्या यूट्यूब चॅनलवर कान्समधील दुसऱ्या दिवसाची झलक दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला. मात्र, या व्हिडिओतील एका छोट्या तपशिलाने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले आहे आणि एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
कान्सच्या झगमगाटात आणि आलियाच्या ग्लॅमरस लुकमध्ये एक गोष्ट सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या, विशेषतः 'रेडिट' युजर्सच्या निदर्शनास आली. आलियाच्या हॉटेलमधील खोलीत असलेल्या एलसीडी स्क्रीनवर तिला 'प्रिय आलिया कपूर' असे संबोधण्यात आले होते
या एका गोष्टीमुळे आलियाने रणबीर कपूरशी लग्न केल्यानंतर आपले नाव कायदेशीररित्या बदलून 'आलिया कपूर' केले आहे का, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर प्रेम जुळले. एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांची कन्या 'राहा'चा जन्म झाला.
लग्नानंतर आलियाने तिचे आडनाव बदलले की नाही, याबद्दल सार्वजनिकरित्या कधीही घोषणा केली नव्हती. त्यामुळे, कान्समध्ये दिसलेल्या या 'आलिया कपूर' उल्लेखामुळे चाहते आणि मीडियामध्ये याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आलिया भट्ट सध्या संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' आणि यशराज फिल्म्सच्या 'अल्फा' चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 'अल्फा'मध्ये ती शर्वरी वाघसोबत काम करत आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील तिच्या धमाकेदार पदार्पणाबद्दल आधीच चर्चा होती, त्यात आता 'आलिया कपूर'च्या नावाने तिने इंटरनेटवर एक नवीनच वाद निर्माण केला आहे. हॉटेलने चुकून हा उल्लेख केला की आलियाने खरोखरच आपले नाव कायदेशीररित्या बदलले आहे, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात कायम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.