Ram Setu Movie: सुब्रमण्यम स्वामींनी या कारणावरून अक्षय कुमारला पाठवली कायदेशीर नोटीस

Ram Setu Controversy: अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा स्टारर चित्रपट राम सेतू घोषणेपासून सतत चर्चेत आहे.
Ram Setu Movie| Akshay Kumar
Ram Setu Movie| Akshay Kumar Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवुडचा खिलाडी म्हणून ओळख असलेला अक्षय कुमार नव्या चित्रपटाच्या वादात सापडला आहे. आगामी चित्रपट 'राम सेतू' चित्रपटाच्या संपूर्ण टीमला तथ्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस मिळाली आहे. भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले की, त्यांनी अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्यासह एकूण 8 जणांना बौद्धिक संपदा हक्कांसाठी नोटीस पाठवली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीला एक वाईट सवय झाली आहे!

सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीतील तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप केला आहे. स्वामींनी ट्विट केले की, 'मुंबई चित्रपटसृष्टीतील लोकांना खोट्या किंवा चुकीच्या गोष्टी दाखवण्याची वाईट सवय आहे.'

Ram Setu Movie| Akshay Kumar
Subramanian Swamy: 'बॉलीवुड वालों को झूठ बोलने की है बुरी आदत' म्हणत सुब्रमण्यम स्वामींनी पाठवली खिलाडीला कायदेशीर नोटीस

सुब्रमण्यम स्वामी यांनी 8 लोकांविरुद्ध नोटिस पाठवली आहे

नोटीसमध्ये लिहिले आहे की, 'त्यांना बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल (Intellectual Property Rights) शिकवण्यासाठी मी वकील सत्या सबरवाल यांच्यामार्फत अभिनेता अक्षय कुमार आणि इतर 8 लोकांविरुद्ध, राम सेतूची प्रतिमा खराब करण्यासाठी कायदेशीर नोटीस जारी केली आहे. गेल्या महिन्यात सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून अक्षय कुमारवर खटला भरणार असल्याचे सांगितले होते.

राम सेतूच्या प्रतिमेचे नुकसान?

त्यांनी ट्विट केले की, 'मी अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या कर्मा मीडियावर गुन्हा दाखल करणार आहे. त्याने त्याचा आगामी चित्रपट राम सेतू चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटामुळे राम सेतूची प्रतिमा खराब झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सुब्रमण्यम स्वामी यांचे वकील सत्य सबरवाल म्हणाले- माझ्या अशिलाने 2007 मध्ये राम सेतूच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात यशस्वी युक्तिवाद केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com