Akanksha Dubey: आकांक्षाने आत्महत्येआधी केली पार्टी नंतर इंस्टाग्रामवर शेअर केली रील

Akanksha Dubey: आपल्या टीमचीदेखील विशेष काळजी घ्यायची असेही त्यांनी म्हटले आहे.
Akanksha Dubey Suicide
Akanksha Dubey SuicideDainik Gomantak
Published on
Updated on

Akanksha Dubey: भोजपूरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबेने आत्महत्या केल्याने सगळीकडे शोककळा पसरली आहे. आता आकांक्षाने आत्महत्या का केली, यामागचे कारण काय याचा तपास पोलिस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा दुबे आपल्या नवीन चित्रपटाच्या शुटिंगसाठी वाराणसी मध्ये आपल्या टीमसह आली होती. ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती तिथेच तिने गळफास घेत आत्महत्या केली.

सकाळी जेव्हा आकांक्षाने लवकर दरवाजा उघडला नाही तेव्हा पोलिसांना माहिती दिली. मास्टर की ने दरवाजा उघडल्यावर आकांक्षाने आत्महत्या केल्याचे आढळून आले.

शनिवारी 25 मार्चला आकांक्षा एका बर्थडे पार्टीसाठी गेली होती आणि उशीरा रात्री ती परतली असे मेकअप आर्टिस्ट राहुल आणि हेअर आर्टिस्ट रेखा मोर्या यांनी म्हटले आहे.

ज्यावेळी ती पार्टीसाठी निघाली होती तेव्हा आकांक्षा कोणत्याही तणावात दिसत नव्हती. याबरोबरच आकांक्षा नेहमी आनंदी राहणे पसंद करायची. आपल्या टीमचीदेखील विशेष काळजी घ्यायची असेही त्यांनी म्हटले आहे.

Akanksha Dubey Suicide
Ravi Kishan: "तिने मला कॉफीसाठी बोलावलं पण मी"....अभिनेत्याने सांगितला 'कास्टिंग काऊच'चा अनुभव

दरम्यान, राहुल आणि रेखाने म्हटले आहे की, तिने आत्महत्येपूर्वी इंस्टाग्रामवर एक रीलही पोस्ट केली होती. ती खुश होती , त्यामुळे ती असे काही करेल असे थोडेदेखील वाटले नाही. या घटनेची सत्यता समोर यावी,आकांक्षाच्या मृत्यूमागे नेमके कारण काय याचा तपास करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com