Adipurush: आदिपुरुष पाहिल्यावर खुद्द रामच म्हणाला हे तर हॉलीवूडचे कार्टून

Adipurush: सीतेला भारताची मुलगी म्हटल्याने नेपाळनेदेखील या चित्रपटाला विरोध केला आहे.
Adipurush- ArunGovil
Adipurush- ArunGovilDainik Gomantak
Published on
Updated on

Adipurush: आदिपुरुष रीलीज झाल्यापासून टीकेचा धनी ठरला आहे. चित्रपटात वापरलेली सुमार दर्जाची भाषा आणि अत्यंत कमी दर्जाचे व्हीएफएक्स यामुळे संपूर्ण देशभरातून चित्रपटावर टीका होत आहे. इतकेच नाही सीतेला भारताची मुलगी म्हटल्याने नेपाळनेदेखील या चित्रपटाला विरोध केला आहे.

आता रामानंद सागर निर्मित रामायण मालिकेत रामाचे पात्र अजरामर करणाऱ्या अरुण गोविल यांनीदेखील या चित्रपटावर टीका केली आहे. ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या आदिपुरुषला हॉलीवूडचे कार्टून म्हणत टीका केली आहे.

आदिपुरुषचा टीझर रिलिज झाल्यानंतर आदिपुरुषच्या प्रोड्यूसरना बदल सुचवले असल्याचे वक्तव्यदेखील त्यांनी केले आहे. ज्या रामायणातील कथेवर, त्यातील पात्रांवर आपण इतकी वर्षे प्रेम करत आलो आहोत त्या कथेमध्ये बदल करण्याची गरज नव्हती. यातील सर्व पात्रे आपल्या जवळची आहेत. चित्रपटाच्या टीमला राम आणि सीतेवर भक्ती नसल्याने त्यांनी हे बदल केले आहेत.

चित्रपटातील संवादाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी घेतली माघार

चित्रपटातील भाषा आणि संवादावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना लेखक मनोज मुंतशीर यांनी पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटात मी 4000हून जास्त संवाद लिहले आहेत. त्यातल्या 5 डायलॉगनी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्या शेकडो ओळी ज्यामध्ये श्रीरामांचे कौतुक गेले आहे, सीतेचे सतीत्व दाखवले आहे , त्याला प्रशंसा मिळाली नाही.

Adipurush- ArunGovil
Karan Deol Reception: शत्रुघ्न सिन्हा ते सलमान खान, सिताऱ्यांच्या हजेरीने सजली मैफील; पाहा व्हिडीओ

माझ्या बांधवांनी सोशल मिडियावर माझ्यासाठी वाईट शब्द लिहले. त्यांनी माझ्या आईसाठी अभद्र शब्दांचा वापर केला. परंतु माझी तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. कारण कालही तुम्ही माझे होता, आजही तुम्ही माझे आहात आणि उद्याही माझे असणार आहात.

मी लिहलेल्या संवादासाठी मी तुम्हाला 100 कारणे देऊ शकतो मात्र त्यामुळे तुमचे दुख कमी होणार नाही. तुमच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे चित्रपटाचे निर्माता निर्देशकांनी संवादात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सुपरस्टार प्रभास, बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपट रिलिज झाल्यामननंतर मात्र प्रेक्षक, समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com