कृत्रीम पायांच्या त्रासाला कंटाळून पंतप्रधानांकडे अभिनेत्री सुधा चंद्रनची विनंती

विमान प्रवास करण्यासाठी जेष्ठ नागरिकांना (Senior citizen) एक कार्ड (Card) द्यावे आणि त्यात मेंन्शन करावे की या नागरिकांना विशेष सेवा देण्यात यावी.
अभिनेत्री सुधा चंद्रन
अभिनेत्री सुधा चंद्रनDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: टेलिव्हिजन इंडस्ट्रीची (television industry) प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) टॅग करत विशेष आवाहनही केले आहे. सुधा चंद्रन यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड जारी करण्याचे आवाहन या व्हिडिओतून केले आहे. विमानाने (plane) प्रवास करताना, ज्येष्ठ नागरिकांची विमानतळावर तपासणी करताना त्यांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी काही सुविधा द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. जेणेकरून सुधा चंद्रन यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानातून प्रवास करताना वारंवार थांबवू नये अशी इच्छा त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे.

खरं तर गोष्ट अशी आहे की जेव्हा सुधा चंद्रन विमानतळावर जातात तेव्हा त्यांना वारंवार थांबवले जाते आणि सुरक्षा कर्मचारी त्यांचे कृत्रिम अवयव (Artificial organs) काढून तपासणी करतात. सुधा चंद्रन यांनी एका रोड अपघातात आपले पाय गमावले. तेव्हापासून त्या कृत्रिम अवयवाच्या मदतीने चालतात. आणि विमानतळावर या अवयवांचीही तपासणी केली जात असल्याने त्यांना त्रास होतो. म्हणून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपली व्यथा व्यक्त केला.

अभिनेत्री सुधा चंद्रन
Birthday Girl परिणीती चोप्राला करायचं होत सैफ अली खानशी लग्न. मात्र करीना म्हणाली...

सुधा चंद्रन यांनी सांगितले की, कृत्रिम अवयव उघडण्याची प्रक्रिया अत्यंत त्रासदायक आहे आणि प्रत्येक वेळी ईटीडी (एक्सप्लोसिव्ह ट्रेस डिटेक्टर) वापरण्याची विमानतळ अधिकाऱ्यांना विनंती करते, पण काही उपयोग झाला नाही.

सुधा चंद्रनने इन्स्टाग्रामवर (Instagram) हा व्हिडिओ शेअर केला आहे. मी जे सांगणार आहे ती खूप वैयक्तिक नोट आहे. मला माझा मुद्दा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सांगायचा आहे. मला असे आवाहन राज्य आणि केंद्र सरकार दोघांनाही करायचे आहे की, मी सुधा चंद्रन, प्रोफेशनल नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. मी कृत्रिम अवयवाच्या मदतीने नाचते मी देशाला अभिमान वाटेल असे काम मी केले आहे. पण प्रत्येक वेळी मी व्यावसायिक भेटींसाठी हवाई प्रवासाला जाते, आणि मला प्रत्येक वेळी विमानतळावर थांबवले जाते.

जेव्हा मी सुरक्षिततेत तैनात असलेल्या सीआयएसएफ अधिकाऱ्यांना विनंती करते की कृपया ETD द्वारे माझे कृत्रिम अवयव तपासा, तरीही ते एकत नाही माझे कृत्रिम अवयव काढून दाखवावेच लागतात. मोदीजी ही माणूसकी आहे का? हा आपलाच देश आहे का? आपल्या समाजात एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीला असा मान देते का? मोदीजींना माझी विनंती आहे की या जेष्ठ नागरिकांना एक कार्ड द्यावे आणि त्यात मेंन्शन करावे की या नागरिकांना विशेष सेवा देण्यात यावी. कारण मी या प्रक्रियेला सामेरे जाते आहे आणि मला नेहमीच असाह्य त्रास या तपासादरम्यान सहन करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com